हा व्हिडीओ बघून वाटतं, “आपणही आयुष्यात काहीही करू शकतो”
लोक म्हणतायत जर कुत्रा हे करू शकतो तर आपण तर आयुष्यात काहीही करू शकतो.
वाघासमोर कोण टिकत असेल? पण इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे जनता आश्चर्यचकित झाली आहे. खरं तर ही क्लिप एका आयएएस अधिकाऱ्याने शेअर केली आहे, ज्यात एक कुत्रा वाघाचा सामना करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कुत्र्याने वाघाला अक्षरशः गार केलंय. हा व्हिडीओ बघून लोकांना एक वेगळा कॉन्फिडन्स आलाय. लोक म्हणतायत जर कुत्रा हे करू शकतो तर आपण तर आयुष्यात काहीही करू शकतो.
हा व्हिडिओ @sumitamisra यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – आजकाल अधिक प्रेरणा मिळाल्याचा परिणाम!
आजकल ज़्यादा मोटिवेशन मिलने का परिणाम! pic.twitter.com/dyMH0B9Fex
— Dr Sumita Misra IAS (@sumitamisra) December 12, 2022
व्हायरल झालेल्या या क्लिपला ७२ हजारांहून अधिक व्ह्यूज, ३ हजार लाईक्स आणि ४०० रिट्वीट मिळाले आहेत. एका युझरने लिहिले की, तो एनर्जी ड्रिंक पिऊन आला होता. इतरांनी लिहिले- “कुत्रे सिंहांची जागा घेतील.”
ही क्लिप १६ सेकंदांची आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की, कुत्र्याने टायगरचा गाल पकडलाय. वाघ स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण कुत्रा त्याला सोडत नाहीये.
एकदा वाघ…स्वत:ला कुत्र्यापासून मुक्त करतो, पण कुत्रा मग त्यावर झडप घालून त्याचं तोंड पकडतो. हे दृश्य पाहून असं वाटतं की, कुत्रा हा जराही न घाबरता वाघावर हल्ला करतोय.