मेट्रो स्टेशनवर CISF जवान आणि कुत्रा सोबत योगा करताना…! VIRAL
व्हिडीओमध्ये कुत्रा मेट्रो स्टेशनवर योगा करताना दिसतोय. या वेळी कुत्र्यासोबत एक तरुणही उपस्थित होता.
जर तुम्हाला कुत्र्यांची आवड असेल तर हा व्हिडिओ तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही म्हणाल व्वा! या व्हिडीओमध्ये कुत्रा मेट्रो स्टेशनवर योगा करताना दिसतोय. या वेळी कुत्र्यासोबत एक तरुणही उपस्थित होता.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ दिल्लीतील मेट्रो स्टेशनमधील आहे. डिफेंडर्स ऑफ इंडिया नावाच्या पेजने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये सीआयएसएफचा एक जवान कुत्र्याला ट्रेनिंग देताना दिसत आहे. जवानाने काही योग मुद्रा केल्या आणि कुत्र्यानेही नेमका त्याच प्रकारचा योग केला.
तरुण जसा योगा करत आहे, तसाच तो कुत्रा अगदी तेच करत आहे. तो बसला की कुत्राही बसतो आणि उभा राहिला की कुत्राही उभा राहतो. लोकांची गर्दी हे बघायला गर्दी होते.
View this post on Instagram
ही घटना कुणीतरी आपल्या कॅमेऱ्यात कैद करून व्हायरल केली. हा व्हिडिओ कधीचा आहे हे माहित नाही, पण व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, CISF चे जवान मेट्रो स्टेशनवर ट्रेनिंग बाँड दाखवत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.