Video: 5 वाघांच्या तावडीत सापडला कुत्रा, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, निसर्गात काहीही होऊ शकतं!
सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात अनेक वाघ एकत्र बसलेले आहेत. या वाघांमध्ये कुत्राही दिसतो.
जंगलाचं नाव ऐकताच लोकांच्या मनात भीती तयार होते, ती भीती असते वन्यप्राण्याची. किंबहुना असे अनेक प्राणी जंगला राहतात, ज्यांच्या समोर माणसांच्या थरकाप उडतो. पण जरी जंगल अनेक धोकादायक प्राण्यांचे घर असलं, तरी दादागिरीच्या बाबतीत वाघाची तुलना होऊ शकत नाही. म्हणूनच त्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं. हेच कारण आहे की बहुतेक प्राणी वाघापासून दूर राहण्यातच आपलं कल्याण मानतात. पण कधीकधी आपण अशी दृश्ये पाहतो ज्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण होतं. (Dog trapped alone among five tigers see what happend next in video)
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. खरं म्हणजे सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात अनेक वाघ एकत्र बसलेले आहेत. या वाघांमध्ये कुत्राही दिसतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही असा विचार करत असाल की आता कुत्र्याचं आता काम झालं. तो काही वाचत नाही. पण थांबा, तुम्ही थोडी घाई केली. कोणत्याही निष्कर्षावर जाण्यापूर्वी, हा व्हिडिओ थोडा काळजीपूर्वक पाहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण प्रकरण समजेल.
व्हिडीओ पाहा:
View this post on Instagram
वाघ कुत्र्याजवळ येतो आणि त्याचा वास घेतो. मग तो त्याच्या अंगावर मान घासतो, कुत्रा त्याला घाबरलेला दिसतो आहे, सोबत दोन वाघही वरच्या खडकावर बसलेले असतात. या दरम्यान, अचानक एक पांढरा वाघ येतो आणि थेट कुत्र्याकडे जाऊन थांबतो आणि तो कुत्र्याला वास देऊन खूप काळजीपूर्वक पाहतो. यामध्ये आणखी दोन वाघ तेथे येतात. आता कुत्रा पाच वाघांमध्ये एकटा अडकतो. मात्र, पुढे काय झाले याबद्दल काहीच माहिती नाही. म्हणूनच लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की शेवटी कुत्र्याचे काय झाले?
या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या कमेंट्सही केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, मी हे पाहून खरोखर घाबरलो आहे. दुसर्याने लिहिले की, मला असे वाटते की हा कुत्रा वाघाबरोबर मोठा झाला आहे, म्हणून कदाचित तो त्यांच्यामध्ये सुरक्षित आहे. तर काही लोकांनी आपली भीती व्यक्त केली आणि लिहिले की आम्हाला माहित आहे की प्रत्यक्षात तो वाघांचा शिकार होणार आहे. हा व्हिडिओ 12 ऑक्टोबर रोजी आपल्या yournaturegram नावाच्या इन्स्टाग्राम हँडलद्वारे शेअर करण्यात आला होता, ज्याला ही बातमी लिहीपर्यंत 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
हेही पाहा: