नवी दिल्ली : कोणतेही काम सहजपणे करण्यासाठी, एखादी व्यक्ती सहसा काही युक्तींचा वापर करते. परंतु, जेव्हा एखादा प्राणी अशाप्रकारे युक्तींचा वापर करतो, त्यावेळी त्याची चर्चा तर होतेच. असाच एक किस्सा आम्ही तुम्हाला येथे सांगू इच्छितो. एका व्यक्तीने आपल्या पाळीव कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या डॉगीने स्वयंपाकघरातून जेवण चोरण्यासाठी काय करामत केली? डॉगीची जेवण चोरण्याची आयडिया अर्थात क्लृप्ती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतेय. तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो. (Doggy fights to steal food from the kitchen, You too will be amazed to see the video)
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहाल की, सर्वप्रथम डॉगीने दोन पायांनी खुर्ची ओढली. त्याचा मालक त्याला पाहत होता, पण डॉगी नेमका काय पराक्रम करतोय हे त्या मालकाला माहित नव्हते. त्यामुळेच कुत्रा अगदी स्वच्छपणे स्वयंपाकघराकडे जात होता. थोड्या वेळाने जेव्हा मालक स्वयंपाकघरात गेला आणि पाहिले, त्यावेळी कुत्रा त्याच खुर्चीवर पाय ठेवून आनंदाने जेवत होता. आता डॉगीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. लोक या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स करण्याबरोबरच लाईक्सचा पाऊस पाडत आहेत.
15 सेकंदांचा हा व्हिडिओ तब्बल 40 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यास सुरुवात केली. एका युजर्सने लिहिले आहे की, डॉगीने जेवण चोरण्यासाठी हा आश्चर्यकारक जुगाड अर्थात भन्नाट आयडिया लढवली आहे. त्याचवेळी दुसऱ्या युजर्सने आपण यापूर्वी कोणताही प्राणी जेवण चोरण्यासाठी अशा युक्त्या वापरताना मी पाहिले नसल्याचे नमूद केले.
हा व्हिडिओ Buitengebieden नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहिपर्यंत हा व्हिडिओ तब्बल 1 लाख 70 हजारांपेक्षा जास्तवेळा लाईक करण्यात आला आहे. त्याचबरोबर 39 हजारपेक्षा जास्त वेळा रिट्विट केले गेले आहेत. व्हिडिओवर आतापर्यंत 1900 पेक्षा जास्त कमेंट्स देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सोशल मीडिया युजर्सदेखील इंटरनेटच्या विश्वास हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.
(Doggy fights to steal food from the kitchen, You too will be amazed to see the video)
When you leave your dog alone for a minute.. pic.twitter.com/OLFvT0TF20
— Buitengebieden (@buitengebieden_) August 17, 2021
इतर बातम्या
Maruti Suzuki ला दणका, डिस्काऊंटची हेराफेरी केल्याप्रकरणी 200 कोटींचा दंड; CCI चा मोठा निर्णय