Video : डॉल्फिनचा ट्रेनरवर हल्ला, काळजाचा थरकाप उडवणारा व्हीडिओ

काळजाचा थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या भयानक घटनेत डॉल्फिनने ट्रेनरवर हल्ला केला. ही घटना मियामी सीक्वेरियममध्ये घडली आहे. एका डॉल्फिनने अचानकपणे त्याच्या ट्रेनरवर हल्ला केला या हल्ल्यात ट्रेनर जखमी झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : डॉल्फिनचा ट्रेनरवर हल्ला, काळजाचा थरकाप उडवणारा व्हीडिओ
डॉलफिनचा ट्रेनरवर हल्ला
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 5:28 PM

मुंबई : काळजाचा थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या भयानक घटनेत डॉल्फिनने (Dolphin) ट्रेनरवर हल्ला केला. ही घटना मियामी सीक्वेरियममध्ये (Miami Seaquarium) घडली आहे. एका डॉल्फिनने अचानकपणे त्याच्या ट्रेनरवर हल्ला केला या हल्ल्यात ट्रेनर जखमी झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video ) होत आहे. हा व्हीडिओ पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स अर्थात पेटाकडूनही शेअर करण्यात आला आहे. न्यूयॉर्क पोस्टकडून या घटनेवर भाष्य करण्यात आलं आहे. “क्लिप मूळत: शोमध्ये उपस्थित असलेल्या छायाचित्रकार शॅनन कारपेंटरने चित्रित केली होती. व्हिडिओमध्ये पाण्यात पोहताना डॉल्फिन ट्रेनरवर हल्ला करताना दिसत आहेत. दुसरीकडे, ट्रेनर पूलच्या बाजूला पोहताना आणि स्वतःला बाहेर काढताना दिसतो. काही सेकंदांनंतर क्लिपमध्ये एक माणूस सर्फबोर्डवर ट्रेनरच्या बचावासाठी येताना दिसतो. प्रशिक्षक बाहेर येताच त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवले जाते”, अशी माहिती त्यांच्यानतीने देण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

एक ट्रेनर डॉल्फिनची प्रशिक्षण देत आहे. अश्यातच हा डॉल्फिन या ट्रेनरवरच हल्ला करतो. यात ट्रेनर किरकोळ जखमी झाला आहे. रिपोर्टनुसार, ट्रेनरला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मियामी सीक्वेरियमच्या अधिकाऱ्यांनी एका निवेदनात सांगितलं आहे की, “सनडान्स’ नावाचा डॉल्फिन पाण्यात ट्रेनरला धडकल्यानंतर तो घाबरला. या दोघांसाठी ही एक अनपेक्षित गोष्ट होती. ट्रेनिंग दरम्यान या डॉल्फिनने अचानक ट्रेनरवर हल्ला केला.

पेटाकडूनही या घटनेची दखल घेण्यात आली आहे. त्यांनीही याबाबत ट्विट केलं आहे. “ब्रेकिंग न्यूज या व्हीडिओमध्ये एक डॉल्फिन ट्रेनरवर हल्ला करताना दिसत आहे. तिचे शरीर पाण्यातून हिंसकपणे पाण्यात फेकताना दिसत आहे. ट्रेनरला हॉस्पिटलमध्ये पाठवताना दिसत आहे”, असं ट्विट पेटाच्या वतीने करण्यात आलं आहे. पुढे “मियामी सीक्वेरियमला मेन्शन करत प्राणी समुद्रकिनारी असलेल्या अभयारण्यांमध्ये पाठवले पाहिजेत!”, असंही पेटाने म्हटलंय.

काळजाचा थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या भयानक घटनेत डॉल्फिनने ट्रेनरवर हल्ला केला. ही घटना मियामी सीक्वेरियममध्ये घडली आहे. एका डॉल्फिनने अचानकपणे त्याच्या ट्रेनरवर हल्ला केला या हल्ल्यात ट्रेनर जखमी झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

Video : भारतीय गाण्यावर न्यूयॉर्कमधल्या टाईम्स स्क्वेअरसमोर ठुमके, लाखो लाईक्स- करोडो व्ह्यूज, व्हीडिओ पाहून तुम्हीही फिदा व्हाल!

Video : रानू मंडलने गायलं कच्चा बदाम गाणं, नवरीच्या लुकमधला व्हीडिओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?

Eknath Khadse Kirit Somaiya Video: राऊतांचा फोटो समोर आला अन् खडसेंना बच्चनचं गाणं आठवलं, सोमय्या काय म्हणाले?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.