Viral Video : दारुड्या नवरदेवाची करामत, नवरी समोर असताना केलं भलतंच काम, सोशल मीडियावर धुमाकूळ

| Updated on: Jun 03, 2021 | 11:02 PM

सध्या असाच एक धम्माल उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नरदेवाने चांगलाच राडा घातल्याचे दिसतेय. (drunk groom bride funny viral video)

Viral Video : दारुड्या नवरदेवाची करामत, नवरी समोर असताना केलं भलतंच काम, सोशल मीडियावर धुमाकूळ
drunk groom viral video
Follow us on

मुंबई : सोशल मीडियाच्या मंचावरील वातावरण नेहमीच गरमागरम असतं. या मंचावर रोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यामध्ये काही व्हिडीओ तर एवढे मजेदार असतात की ज्यांना पाहून आपल्याला हसू आवरत नाही. सध्या असाच एक धम्माल उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नरदेवाने अजब प्रकार केला आहे. (drunk Groom not able to understand who is his Bride funny video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा लग्न समारंभातील आहे. लग्न समारंभात नवरीच्या गळ्यात वरमाला टाकताना नवऱ्या मुलाने चांगलीच धम्माल उडवून दिली आहे. या व्हिडीओमध्ये नवरा मुलगा हा दारूच्या नशेत दिसतो आहे. त्याला आपल्या समोर कोण उभं आहे, हे समजत नाहीये. आपल्या होणाऱ्या बायकोच्या गळ्यात वरमाला टाकताना तो चांगलाच गोंधळला आहे. याच कारणामुळे त्याने बायको समजून बाजूला उभी असलेल्या मुलीच्या गळ्यात वरमाला टाकली आहे. दारुच्या नशेत असल्यामुळे नवऱ्या मुलाकडून ही चूक झाल्याचे वाटतेय.

बाजुला उभी असलेली मुलगी भडकली

हा प्रकार घडल्यामुळे बाजूला उभी असलेली मुलगी नवऱ्या मुलावर चांगलीच भडकली आहे. नवरदेवाने घातलेली वरमाला या मुलीने काढून थेट फेकून दिली आहे. त्यानंतर नवऱ्या मुलाच्या मित्रांनी पुन्हा एकदा नवरदेवाजवळ वरमाला देत ती खऱ्या नवरीच्या गळ्यात टाकण्याचे सांगितले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान हा व्हिडीओ नैसर्गिक नसून त्याला मुद्दामहून शूट केलेले असावे असा अंदाज अनेकजण बांधत आहेत. मात्र, या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ ‘official_niranjanm87’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला लोक आवडीने पाहत असून तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

इतर बातम्या :

Video | डोक्यावर ओढणी घेऊन पोळ्या लाटणारी तरुणी, सौंदर्याचे नेटकरी दिवाने, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | व्हिडीओ शूटिंग करायला पाण्यात उतरले, अचानक पाणघोड्याकडून थरारक पाठलाग

Video | बिबट्याची थेट पाण्यात उडी, एका सेकंदात मगरीची शिकार, पाहा थरारक व्हिडीओ

(drunk Groom not able to understand who is his Bride funny video goes viral on social media)