Viral: भाईंनी विमान चोरला…शेट लोका! सगळ्यांची नजर चुकवून विमान घेऊन फरार, दीड तास विमान हवेत!

विमानतळ अधिकाऱ्यांनी टर्मिनलच्या आत बसविलेल्या कॅमेऱ्यात हा कैद झालेला व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये घटनेपूर्वीची परिस्थिती स्पष्ट केली गेली आहे. या फुटेजमध्ये विमानतळावर सामानाचे हँडलर म्हणून काम करणारा 29 वर्षीय रिचर्ड रसेल सुरक्षा तपासणीतून जाताना दिसत आहे.

Viral: भाईंनी विमान चोरला...शेट लोका! सगळ्यांची नजर चुकवून विमान घेऊन फरार, दीड तास विमान हवेत!
Dude stole a planeImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 12:57 PM

विमानतळावर विमान (Airplane) अपघाताच्या अनेक घटनांबद्दल तुम्ही ऐकले असेल, पण विमानतळावरून विमान चोरीच्या कोणत्याही घटनेबद्दल तुम्ही कधी वाचले आहे का? आम्ही तुम्हाला अशा एका किस्साबद्दल सांगणार आहोत ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. अमेरिकेत चार वर्षांपूर्वी ही घटना घडली होती, मात्र आता हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे विमान चोरणारी व्यक्ती दहशतवादी किंवा गुन्हेगार नसून विमानतळावर मालाची वाहतूक करणारा कर्मचारी होता. ‘डेली मेल’च्या रिपोर्टनुसार, या व्हिडीओमध्ये 10 ऑगस्ट 2018 रोजी विमान चोरणारा सिएटल टॅकोमा एअरपोर्टवर एअरपोर्टचा कर्मचारी (Airport staff) दिसत आहे. मात्र, नंतर विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. विमानतळ अधिकाऱ्यांनी टर्मिनलच्या आत बसविलेल्या कॅमेऱ्यात हा कैद झालेला व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये घटनेपूर्वीची परिस्थिती स्पष्ट केली गेली आहे. या फुटेजमध्ये विमानतळावर सामानाचे हँडलर म्हणून काम करणारा 29 वर्षीय रिचर्ड रसेल (Richard Russel) सुरक्षा तपासणीतून जाताना दिसत आहे.

‘द स्काईज नो लिमिट’

रसेलने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला असून त्याच्या मागील बाजूस ‘द स्काईज नो लिमिट’ असे लिहिले आहे. पाच तासांनंतर, तो विमानतळाच्या कार्गो भागात दिसला आणि विमान पुन्हा टॅक्सीवेवर ढकलण्यासाठी टो वाहनाचा वापर करताना दिसला. त्यानंतर रिकाम्या प्रवासी विमानासह विमानतळावरून तो पसार झाला. एअर ट्रॅफिक कंट्रोलने विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. माहितीनुसार, लढाऊ विमानानं या विमानाचा पाठलागही केला होता, मात्र रसेल हे विमान अत्यंत धोकादायक पद्धतीनं उडवत होता.

हे सुद्धा वाचा

व्हिडिओ

चोराला जीव गमवावा लागला

दरम्यान, त्याने विमान उडवताना एअर ट्रॅफिक कंट्रोलला सांगितले की, तो हवेत आहे आणि यात खूप मजा आहे. विमानतळावरील अधिकारी त्याला सतत सेफ लँडिंगची मागणी करत होते. यावर रसेलने त्याला सेफ लँडिंग केलं तर पायलटची नोकरी मिळेल का, अशी विचारणा सुद्धा केली. एअर ट्रॅफिक कंट्रोलरने त्याचा पॉइंट कट करून पुन्हा विमान उतरवण्याचे आवाहन केले. त्याला उत्तर देताना रसेल म्हणाला की, जर मी खाली आलो तर ते मला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मला वाटते की मी सेफ लँडिंग करताना काहीतरी चुकीचे करू शकतो, मला ते करायचे नाही. यानंतर अधिकाऱ्यांनी असा इशारा दिला की, जरी तुम्ही सुरक्षित लँडिंग केलंत तरी तुम्हाला या घटनेसाठी शिक्षा भोगावी लागेल. रसेल विमान चालवताना गप्पा मारत होता, या सगळ्या गोंधळात त्याने सुमारे दीड तास विमान उडवले, त्यानंतर एका बेटावर क्रॅश लँडिंग केले आणि या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.