बापरे! अमेरिकेत दोन विमानांची टक्कर, व्हिडीओ व्हायरल

शहराच्या मुख्य भागापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या डलास कार्यकारी विमानतळावर शनिवारी दुपारी १.२० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

बापरे! अमेरिकेत दोन विमानांची टक्कर, व्हिडीओ व्हायरल
airplanes collideImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 10:33 AM

अमेरिकेतील डलासमध्ये एअर शो दरम्यान दोन लढाऊ विमानांची टक्कर झालीये. या दुर्घटनेनंतर दोन्ही युद्ध विमानांना भीषण आग लागली होती. माजी सैनिक दिनानिमित्त या एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. दुर्घटनाग्रस्त विमानाची मालकी असलेल्या कमिशनर एअर फोर्सच्या प्रवक्त्या लिया ब्लॉक यांनी सांगितले की, बी-17 फ्लाइंग फोर्ट्रेस बॉम्बर विमानात पाच क्रू मेंबर्स होते आणि पी-63 किंग कोब्रा फायटर जेटवर एक व्यक्ती होती. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहराच्या मुख्य भागापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या डलास कार्यकारी विमानतळावर शनिवारी दुपारी 1.20 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

अपघातानंतर रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. माहितीनुसार, वॉर प्लेन क्रॅशमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

ॲन्थनी मॉन्टोया, हा अपघात ज्याने पाहिला त्याने सांगितले की, “मी तिथेच उभा होतो. मला पूर्णपणे धक्का बसला आणि मला काहीच समजत नव्हतं. आजूबाजूचे सर्वजण धापा टाकत होते. सगळे जण रडत होते. सर्वांनाच धक्का बसला होता.

विशेष म्हणजे डलासमध्ये झालेल्या युद्ध विमान दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये दोन्ही विमानांना आग लागल्याचे पाहायला मिळत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली.

डलासचे महापौर एरिक जॉन्सन म्हणाले की, राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने विमानतळाचा ताबा घेतला आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकातील लोकांनी मदत केलीये.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.