Video | रस्ता नेमका ओलांडावा कसा ? शेवटी मोठा भाऊ सरसावला, व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओसुद्धा लहान मुलांचाच आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये विनोद नसून यामध्ये मोठ्या भावाची जबाबदारी प्रतित होत आहे. (elder younger brother viral video)

Video | रस्ता नेमका ओलांडावा कसा ? शेवटी मोठा भाऊ सरसावला, व्हिडीओ एकदा पाहाच
BIG BROTHER VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 12:08 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे लहान मुलांचे असतात. त्यांचा खट्याळपणा, लहान मुलांचं लडीवाळ बोलणं हे लोकांना खूपच आवडतं. कदाचित याच कारणामुळे लहाने मुलांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओसुद्धा लहान मुलांचाच आहे. मात्र, या व्हिडीओमध्ये विनोद नसून यामध्ये मोठ्या भावाची जबाबदारी प्रतित होत आहे. (elder brother helps his younger brother and sister to cross the road video goes viral on social media)

असं म्हणतात की मोठं भाऊ होणं हे सोपं नाही. मोठ्या भावावर खूपसाऱ्या जबादाऱ्या असतात. आपल्या लहान भावाची काळजी घेण्यापासून ते त्यांच्या भवितव्यापर्यंत अशा अनेक बाजूंनी मोठ्या भावाला विचार करावा लागतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधूनसुद्धा मोठ्या भावाची हीच भूमिका अधोरेखित होत आहे. या व्हिडीओमध्ये मोठा भाऊ त्याची भूमिका चोखपणे पार पाडताना दिसतोय.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तीन छोटी मुले दिसत आहेत. यामध्ये एक मुलगी आहे. हे तिघेही रस्त्यावरून चालत जाताना दिसत आहेत. मात्र, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे या तिघांना समोर जाता येत नाहीये. हे लक्षात येताच यातील मोठ्या मुलाने आपल्या लहान भावंडांना एक-एक करुन पाठीवर घेतले आहे. तो आधी आपल्यापेक्षा छोटी असलेल्या बहिणीला पाठीवर घेऊन सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवतोय. त्यांतर सर्वात लहान असलेल्या भावलाही पाठीवर घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचवतो आहे. त्यानंतर तिघेही आपल्या इप्सित ठिकाणी जाताना दिसतायत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या व्हिडीओतील मोठ्या भावाला शाबासकी दिली आहे. तसेच त्याच्या समजदारीला सलाम ठोकला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, हे समजू शकले नाही. मात्र, @tweetbyjounralist या अकाऊंटवरुन त्याला शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | चेहऱ्यावर लावला अन् महिला हसायला लागली, नव्या एलईडी मास्कची चर्चा, पाहा व्हायरल व्हिडीओ

Viral Video | नव्या जोडीचा लग्न मंडपात बहारदार डान्स, नवरीचे ठुमके पाहून लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Video | नळाच्या पाण्याखाली राजेशाही थाट, ठुमकत ठुमकत कासवाची शाही अंघोळ

(elder brother helps his younger brother and sister to cross the road video goes viral on social media)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.