Video: संकटात खचून गेलेल्यांना प्रेरणा देणारा पुण्याची आजी, नेटकऱ्यांनी केला आजीला सलाम

पुण्यात राहणारी एक गरीब आजी, जी आर्थिक परिस्थितीला कंटाळून भीख न मागता, या वयातही एक छोटा व्यवसाय करते आहे.

Video: संकटात खचून गेलेल्यांना प्रेरणा देणारा पुण्याची आजी, नेटकऱ्यांनी केला आजीला सलाम
आजीचं नाव रतन आहे, ती पुण्यातील एमजी रोडवर पेन विकते.
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 3:13 PM

म्हणायला आयुष्य खूप सुंदर आहे, पण काहींच्या आयुष्यात अशी संकटं येतात, की ते हार मानतात. पण त्याचवेळी काही माणसे अशी असतात की, त्यांना पराभवालाही हरवण्याची सवय असते. सध्या एका आजीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. कारण तिने पराभव स्वीकारला नाही. सध्याला पुण्यात राहणारी एक गरीब आजी, जी आर्थिक परिस्थितीला कंटाळून भीख न मागता, या वयातही एक छोटा व्यवसाय करते आहे. (Elderly woman selling pens on street story goes viral on social media)

मिळालेल्या माहितीनुसार, या आजीचं नाव रतन आहे, ती पुण्यातील एमजी रोडवर पेन विकते. ती बॉक्समध्ये पेन ठेवून लोकांना विकते. पण ज्या पेटीत ठेऊन विकते, त्या पेटीवर लिहलेलं महत्त्वाचं आहे. पेटीवर लिहलेलं आहे की, ‘मला कोणाकडे भीक मागायची नाही. कृपया 10 रुपयात निळा पेन खरेदी करा, धन्यवाद, आशीर्वाद. खरं म्हणजे आजच्या जगात असा जिवंतपणा कुठे पाहायला मिळेल. लोक स्त्रीच्या या भावनेला मनापासून सलाम करत आहेत. या आजीचा फोटो खासदार विजय साई रेड्डी व्ही. यांनी शेअर केला आहे.

व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by Shikha Rathi (@sr1708)

रतन आजीची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांची जोरदार स्तुती केली. अनेक युजर्सने या पोस्टलाही सलाम केला आणि त्याला त्यांची प्रेरणा म्हटले. आजीची गोष्ट शेअर करताना अनेक लोकांनी लिहिले की, जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःला एक पराभूत समजत असाल, तेव्हा त्यांच्याकडून प्रेरणा घ्या, कारण असे लोक जगात खूप निवडक असतात. दुसर्‍याने लिहिले की, आयुष्य कितीही अडथळे आले तरी थांबू नका. असे काही लोक आहेत ज्यांनी आता त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आयुष्य जगून दाखवलं आहे.

हेही पाहा:

Video: गळात किंग कोब्रा घेऊन सर्पमित्राचे स्टंट, लोक म्हणाले, बाबा जपून, सापाचा काही भरवसा नसतो!

हॉटेलमधला धक्कदायक प्रकार, थुंकी लावून भाजत होता रोटी, पोलिसांनी आचाऱ्याला दाखवला इंगा

 

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.