महाकाय हत्ती आणि जंगलाचा राजा सिंह! भांडणात कोण जिंकलं असेल?
या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या दोघांमध्ये टक्कर झाली असती तर शेवटी कोण जिंकले असेल, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
सिंहाला जंगलाचा राजा मानले जाते परंतु जेव्हा त्याचा सामना वनराज हत्तीशी होईल तेव्हा काय होईल. या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या दोघांमध्ये टक्कर झाली असती तर शेवटी कोण जिंकले असेल, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हा व्हिडीओ बघा तुमच्या सगळ्या शंका दूर होतील. स्वच्छ पाण्याने भरलेल्या जंगलातील तलावाच्या काठावर ही घटना घडली. हत्ती गेला पाणी प्यायला तिथे होता जंगलाचा राजा. मग काय? व्हिडीओ व्हायरल. त्या नळीजवळ बसून एक सिंहिणी विश्रांती घेत आहे. अचानक तिला काहीतरी जवळ आल्यासारखं वाटतं, ज्यामुळे ती सतर्क होते. तेवढ्यात तेथे एक महाकाय हत्ती पाणी पिण्यासाठी येतो.
हत्ती आधी दबकत दबकत तिथे जायला लागतो, मग धोक्याचा वास घेतो आणि पटकन पुढे जातो. त्याची नजर सिंहिणीवर पडते. आता व्हिडीओ बघताना आपल्याला वाटतं की नेमकं कोण कुणाला घाबरेल. तेवढ्यात त्याची नजर दुसऱ्या बाजूला बसलेल्या सिंहिणीवर पडते. पण सिंहिणीला घाबरण्याऐवजी तो पुढे जातो आणि तिच्यावर पाणी टाकायला जातो. हे बघून सिंहीण घाबरून मागे पळते.
हत्तीला अशा प्रकारे आपल्या मागे येताना पाहून सिंहिणी तिथून निघून जाते. पण हत्तीचा राग शांत होत नाही. तो तिचा पाठलाग करतो, त्यानंतर सिंहिणी तिथून पळून जाते.
हा व्हिडिओ 4 मार्च रोजी ‘द लेटेस्ट साइट्स’वर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हत्तीने सिंहावर पाणी शिंपडले.” या व्हिडिओवर लोक विविध मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, हत्तीने सिंहिणीसोबत होळी खेळली. त्याचवेळी एका युजरने म्हटले आहे की, जंगलाचा खरा राजा सिंह नसून वनराज आहे आणि त्याने हे दाखवून दिले.