Viral Video: पर्यटकांच्या गाडीवर हत्तींचा हल्ला, गाडी उलटवली आणि त्यानंतर जे झालं, त्याने अंगावर शहारे येतील!

जशी गाडी हत्तीच्या जवळ जाते, तसाच हत्ती गाडीच्या दिशेने धावू लागतो, मग अचानक आणखी बरेच हत्तीही बाहेर येतात आणि सगळे गाडीच्या दिशेने धाऊ लागतात.

Viral Video: पर्यटकांच्या गाडीवर हत्तींचा हल्ला, गाडी उलटवली आणि त्यानंतर जे झालं, त्याने अंगावर शहारे येतील!
पर्यटकांच्या गाडीवर हत्तींचा हल्ला
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 12:01 PM

निसर्ग आणि प्राण्यांचं जग हे वेगळंच आहे, तिथं त्यांचंच राज्य चालतं. म्हणून म्हणतात, की जेव्हाही वेळ मिळेल, तेव्हा हे जग पाहायला हवं, निसर्गाने काय घडवलंय, हे आपल्याला कळतं. पण कधीकधी माणसाचं, जंगलात होत चाललेलं अतिक्रमण या प्राण्यांना सहन होत नाही, असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. (Elephant Attack on tourist Vehicle when they got angry after seeing the tourists in the forest shocking video)

आपल्याला माहित आहेत की, हत्ती हे खूप हुशार असतात. ते जितके प्रेमळ, मायाळू आणि दयावान असतात, तितकेच ते आक्रमक असतात. हत्तीच्या नादी लागायला जंगलाचा राजाही घाबरतो, भलेभले यांना पाहून आपला रस्ता बदलतात. हत्तींच्या रागाचा असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून हत्तींना जंगलात एवढा मान का दिला जात असेल, याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जंगलात फिरत असलेल्या काही पर्यटकांच्या गाड्यांना आपल्या जवळ येताना पाहून हत्तींना राग आला आणि त्यांनी त्या पर्यटकावर हल्ला केला. त्यानंतर जे झाले ते पाहून कुणाच्याही अंगावर शहारे उभे राहतील. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. IFS अधिकारी सुधा रामेन यांच्या पेजवर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – किमान त्यांच्या घरात जाऊन त्यांना आपण त्रास देऊ नये, नाहीतर ते काहीही करु शकतात, प्राण्यांच्याही प्रायव्हसीचा आदर करायला शिका.

व्हिडीओ पाहा:

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हत्ती दूरवर दिसत आहे आणि त्यांच्या समोर एक वाहन आहे, ज्यामध्ये पर्यटक दिसत आहेत. जशी गाडी हत्तीच्या जवळ जाते, तसाच हत्ती गाडीच्या दिशेने धावू लागतो, मग अचानक आणखी बरेच हत्तीही बाहेर येतात आणि सगळे गाडीच्या दिशेने धाऊ लागतात. हत्ती गाडीजवळ येताच तो पूर्ण ताकदीने गाडी पलटायला लागतो आणि गाडी पलटी होताच, सर्व पर्यटक गाडीतून खाली पडतात आणि उठल्याबरोबर जीव वाचवण्यासाठी सगळे तिथून पळू लागतात. . हा व्हिडिओ पाहून सर्व सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित होत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत.

लोकांनीही या व्हिडिओवर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने लिहिले – कोणत्याही जंगलात जाण्यापूर्वी, काही नियम पाळले पाहिजेत, हे आपण सध्या विसरलो आहे असे दिसते. दुसर्‍या यूजरने लिहिले – हा व्हिडिओ खूप वाईट आहे, जसं आपलं आयुष्य आहे, तसंच या प्राण्यांचंही आहे. आपण त्यांचा पूर्ण आदर केला पाहिजे. तिसर्‍या युजरने लिहिले – माणसं स्वतःच्या आनंदासाठी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात, ज्यामुळे त्यांची शांतता बिघडते.. फक्त अंतर राखून तुम्ही सफारी आणि जंगलाचा आनंद घेऊ शकता.. खूप जवळ जाणं धोकादायक ठरू शकतं.

हेही पाहा:

Video: मालकाने चेहऱ्याला साबण लावला, आणि कुत्र्याने पाणी बंद केलं, पाहा कुत्र्याच्या हुशारीचा भन्नाट व्हिडीओ!

Video: आई म्हणते सफरचंद खा, चिमुरडी म्हणते, मला समोसाच हवा, पाहा आई-मुलीचा गोड संवाद!

 

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.