धक्कादायक! हत्तीला आला राग, पुढे जे झाले ते पाहून नेटकऱ्यांचाही उडाला थरकाप
हत्तींची गणना ही जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जाते. सर्वसामान्यपणे हत्ती हे खूप शांत प्राणी असतात. परंतु त्यांना राग आल्यानंतर त्यांच्यासमोर कोणीही टिकू शकत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे.
Viral video : हत्तींची (elephant) गणना ही जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये केली जाते. सर्वसामान्यपणे हत्ती हे खूप शांत प्राणी असतात. परंतु त्यांना राग आल्यानंतर त्यांच्यासमोर कोणीही टिकू शकत नाही. यामुळेच जंगलाचा राजा सिंह देखील हत्तींपासून योग्य अंतर राखून असतो. सोशल मीडियावर हत्तींशी संबंधित अनेक धक्कादायक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, परंतु सध्या हत्तीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अश्चर्याचा धक्का बसेल. हा व्हिडीओ दक्षिण अफ्रिकेमधील आहे. इसिमंगलिसो वेटलँड पार्कमध्ये संतप्त हत्तीने लोकांनी भरलेली एसयूव्ही कार उलटवली. ही क्लिप तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या लोकांनी चित्रित केली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो.
हत्तीचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
हा व्हिडीयो अवघ्या 16 सेकंदाचा आहे. या व्हिडीओमध्ये एक संतप्त हत्ती एका सुनसान जंगलाच्या वाटेवर रस्त्याच्या मधोमध एसयूव्ही कार ढकलताना दिसत आहे. हत्ती या कारला उलटवतो. मात्र कार उलटून देखील हत्तीचे समाधान होत नाही. कार उलटल्यानंतर देखील हा हत्ती त्या कारला ढकलताना दिसत आहे. व्हिडीओ बनवणारे जे दुसऱ्या गाडीतील लोक आहेत ते सतत गाडीचा हॉर्न वाजवत आहेत. जेणेकरून ते हत्तीचे लक्ष विचलित करू शकतील आणि गाडी हत्तीच्या तावडीतून सोडू शकतील. मात्र या व्हिडीओमध्ये हा हत्ती अधिक आक्रमक झालेला दिसत आहे.
व्हिडीओवर कमेंटचा पाऊस
दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पडत आहे. नेटकरी विविध कमेंट करताना दिसत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, माला खात्री आहे या लोकांनी गाडीचा हॉर्न जोरजोरात वाजवून हत्तीला राग आणला. जोरात वाजणाऱ्या हॉर्नमुळे हत्ती अधिक आक्रमक झाला व त्याने अशापद्धतीने बदला घेतला. असे म्हटले जाते की, हत्तीचे कान हे अधिक सेनसेटिव्ह असतात. त्यांना जोरजोराने वाजनाऱ्या हॉर्नचा प्रंचड त्रास होतो. त्यामुळे हत्ती जवळपास असताना कोणत्याही साधनाचा मोठा आवाज करू नये अथवा ते अधिक आक्रमक होऊ शकतात.
संबंधित बातम्या
Video | मसाला डोसा आईस्क्रिम रोल! ऐकायला इतकं विचित्र आहे, चवीला कसं असेल?
Video | भूकंप आला तर जीव वाचवाल की दारुच्या बाटल्या? हा दादुस दारुसाठी जीवही द्यायला तयार!