Video | नुकत्याच जन्मलेल्या हत्तीच्या पिल्लाचं जंगी स्वागत, जंगलातील हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ तर नेटकरी विशेष रूपाने पसंद करतात. त्यांनी केलेली मस्ती नेटकऱ्यांचा मूड फ्रेश करणारी असते. सध्या तर एक अतिशय मजेदार असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नुकत्याच जन्मलेल्या हत्तीच्या पिल्लाचे दमदार स्वागत करण्यात आले आहे.

Video | नुकत्याच जन्मलेल्या हत्तीच्या पिल्लाचं जंगी स्वागत, जंगलातील हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल
ELEPHANT
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 8:21 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे आपल्याला थक्क करून सोडतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण पोट धरून हसायला लागतो. प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ तर नेटकरी विशेष रूपाने पसंद करतात. त्यांनी केलेली मस्ती नेटकऱ्यांचा मूड फ्रेश करणारी असते. सध्या तर एक अतिशय मजेदार असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नुकत्याच जन्मलेल्या हत्तीच्या पिल्लाचे दमदार स्वागत करण्यात आले आहे.

हत्तीच्या पिल्लाचे केले दमदार स्वागत

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला शेल्ड्रिक वाईल्डलाईफ ट्रस्टने शेअर केले आहे. हा व्हिडीओ एका जंगलातील असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये हत्तीचे एक छोटे दिसत पिल्लू आहे. ते अडखळत अडखळत चालत आहे. नुकतेच जनमलेले हे पिल्लू चालण्याचा प्रयत्न करते आहे. पिल्लाने चालण्यास सुरूवात करताच बाकीच्या हत्तींना खूप आनंद झाल्याचे दिसत आहे. पिल्लाने पाऊल टाकताच बाकीचे मोठे हत्ती त्याच्या जवळ जात आहेत.

बाकीच्या हत्तींना झालेला आनंद कॅमेऱ्यात कैद

पिल्लाच्या जवळ जाऊन बाकीच्या हत्तींनी आनंद व्यक्त केला आहे. हत्ती आपल्या सोंडेने पिल्लावर माया करत असल्याचे आपल्याला दिसत आहे. काही हत्ती तर आनंदात ओरडतसुद्धा आहेत. छोट्याशा पिल्लाचे असे आगळेवेगळे स्वागत कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. नव्याने जन्मलेल्या पिल्लाचे कशाप्रकारे स्वागत केले जात आहे, हे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

हा व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही मात्र नेटकरी त्याला मोठ्या प्रमाणात पसंद करत आहेत. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने हा व्हिडीओ अतिशय छान असल्याचे म्हटले आहे. तर दुसर्‍या एका माणसाने हत्तीचे पिल्लू सुरक्षित हातांमध्ये असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओ सध्‍या इन्स्टाग्रामवर  Sheldricktrust या अकाऊंटवर पाहायला मिळेल.

इतर बातम्या :

Video | नाद करायचा नाय ! चेन्नईच्या पठ्ठ्याने चालवली दोन चाकांवर रिक्षा, भलेभले स्टंटबाज गप्प, व्हिडीओ व्हायरल

Video | 14 फुटाच्या सापासोबत खेळ, गळ्यात घालून गावभर फिरणं महागात, क्षणात जीव गेला, नेमकं काय घडलं ?

Video: कंगव्याच्या आत भरला कॅचअप, नवऱ्याच्या प्रँकमुळे बायको चवताळली, व्हिडीओ तुफान व्हायरल

बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....