Video : जंगल सफारीसाठी गेलेल्या लोकांवर हत्तीचा हल्ला, लोक इकडून तिकडे धावू लागतात, पुढे काय घडतं? पाहा…

हा व्हीडिओ wildlife_welfare नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे.

Video : जंगल सफारीसाठी गेलेल्या लोकांवर हत्तीचा हल्ला, लोक इकडून तिकडे धावू लागतात, पुढे काय घडतं? पाहा...
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 3:07 PM

मुंबई : जंगल सफारी करायला कुणाला नाही आवडत? आपण एकदातरी जंगल सफारीसाठी जावं, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र काहीवेळा या सफारी (Jungle Safari) दरम्यान अपघात घडतात. त्याचे व्हीडिओ समोर येतात. आताही हत्तीच्या हल्ल्याचा एक व्हीडिओ समोर आला आहे. हत्ती हा जंगलातील सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो.पण हत्तीला राग आला की तर तो कुणालाही जुमानत नाही. सध्या सोशल मीडियावर जंगल सफारीचा एक व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक जंगल सफारीचा आनंद लुटत असल्याचं दिसत आहे. इतक्यात हत्ती त्यांच्यावर हल्ला करताना दिसत आहे.

पर्यटकांची एक गाडी जंगलात पर्यटकांना फिरवताना दिस आहे. यादरम्यान तिथे एक हत्ती येतो. पर्यटकांनी हत्ती पाहिल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो.यानंतर ते त्या हत्तीचे फोटो काढायला, व्हीडिओ काढायला सुरुवात करतात. त्यानंतर हत्तीला राग येतो. तो त्या पर्यटकांवर हल्ला करतो. हत्ती इतका संतापतो की त्या जिप्सीवर हल्ला चढवतो. यानंतर पर्यटकांची एकच धांदल उडते. ते कसेबसे पळून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात.

हा व्हीडिओ wildlife_welfare नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 35 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर या व्हीडिओला 56 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.

याआधीही पर्यटकांच्या गाडीत सिंह शिरल्याचा व्हीडिओ समोर आला होता. काही लोक जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांसाठीच्या गाडीतून जंगल सफारीला गेले होते.याचवेळी अचानक एक सिंह त्यांच्या समोर येतो. तो त्यांच्या गाडीत शिरतो. सिंहाला पाहून गाडीतील लोक घाबरतात. पण त्यानंतर जे घडतं ते त्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पुढे हा सिंह आक्रमकपणे आपल्यावर हल्ला करेल असं या गाडीतल्या लोकांना वाटतं. पण इतक्यात तो सिंह अगदी अनपेक्षित वागतो. तो गाडीत बसलेल्या व्यक्तीला कुरवाळतो. त्याला जवळ घेतो. मग गाडीतली एक महिलाही या सिंहाच्या आयाळावरून हात फिरवते. हा असा आश्चर्याला सुखद धक्का देणारा व्हीडिओ खूप व्हायरल झाला.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.