जवळपास 14 महिन्यानंतर आपल्या केअरटेकरला भेटले हत्ती, या प्रकारे झालं स्वागत, पाहा व्हिडीओ
हत्तीचा कळप आपल्या केअरटेकरकडे चालताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सर्वांच्याच पसंतीला उतरत आहे. या व्हिडीओत पाहायला मिळणाऱ्या व्यक्तीची डेरेक थॉम्पसन (Derek Thompson) अशी आहे. डेरेक थॉम्पसनला पाण्यात उभं असलेलं पाहिलं जाऊ शकतं आणि त्याच्यासोबत अनेक हत्ती पाहायला मिळत आहेत. सर्व हत्ती सोंडेने थॉम्पसन यांचे शानदार स्वागत करताना दिसत आहेत.
मुंबई : प्राणी आणि नागरिकांचं नातं खूप सुंदर असतं. दोघांमधील व्हिडीओ इतके प्रिय असतात की ते सर्वांना आवडतात. प्राणी आणि माणसांमधील नातं खऱ्या अर्थाने अनोखं आणि प्रेमळ असतं. दोघांमधील मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जातात, जे सर्वांचं मन जिंकतात. अनेकदा असे व्हिडीओ पाहून वाटतं की प्राण्यांपेक्षा चांगला मित्र कुणी असू शकत नाही. हीच बाब सिद्ध होण्यासाठी एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे.
इंटरनेटवर आता जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यात हत्तीचा कळप आपल्या केअरटेकरकडे चालताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सर्वांच्याच पसंतीला उतरत आहे. या व्हिडीओत पाहायला मिळणाऱ्या व्यक्तीची डेरेक थॉम्पसन (Derek Thompson) अशी आहे. डेरेक थॉम्पसनला पाण्यात उभं असलेलं पाहिलं जाऊ शकतं आणि त्याच्यासोबत अनेक हत्ती पाहायला मिळत आहेत. सर्व हत्ती सोंडेने थॉम्पसन यांचे शानदार स्वागत करताना दिसत आहेत. पुढे थॉम्पसन हत्तींना प्रेमाने कुरवाळताना आणि भेट घेताना दिसत आहे.
हत्तीचा कळप आपल्या केअरटेकरला 14 महिन्यांनी भेटला!
महत्वाची बाब म्हणजे हे सर्व हत्ती आपल्या केअरटेकला 14 महिन्यांनंतर भेटले होते. रिपोर्टनुसार हा व्हिडीओ इंसिडेंट थायलंडमधील नेचर पार्कचा असल्याचं सांगितलं जातं. जो कुणी हा व्हिडीओ पाहत आहे तो भावनिक होत आहे. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सद्वारे आपली भावना व्यक्त करताना दिसत आहेत. अनेकजण हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर करत आहेत. व्हिडीओ पाहून वाटतं की, एखादा व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्तीला खूप दिवसानंतर भेटत आहे.
Elephants reunite with their caretaker after 14 months..
Sound on pic.twitter.com/wSlnqyuTca
— Buitengebieden (@buitengebieden_) December 23, 2021
व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस
सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस सुरु आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एक यूजर म्हणतो की, खरंच प्राणी आपला मित्र कधीही विसरत नाहीत. तर प्राणी आणि माणसांमधील मैत्री कमाल असते, असं एकानं म्हटलंय. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही हा व्हिडीओ Buitengebieden नावाच्या ट्वीटर हँडलवर पाहू शकता.
इतर बातम्या :