एलन मस्क यांनी ट्विटर वरील नाव बदलताच सोशल मीडियावर memes!
त्यांनी आपलं नाव बदलून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केलं आहे. एलन मस्क यांनी आता आपलं नाव बदललं आहे. मस्क यांनी ट्विटरवर आपल्या डिस्प्लेचे नाव बदलले आहे.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क ट्विटर विकत घेतल्यापासून युजर्समध्ये चर्चेत आहेत. मग तो त्यांचा निर्णय असो किंवा त्यांचं ट्विट इंटरनेटच्या दुनियेत येताच व्हायरल होते. यावेळी त्यांनी आपलं नाव बदलून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केलं आहे. एलन मस्क यांनी आता आपलं नाव बदललं आहे. मस्क यांनी ट्विटरवर आपल्या डिस्प्लेचे नाव बदलले आहे. आता ते मिस्टर ट्वीट आहेत.
एलन मस्क ट्विटरवर खूप ॲक्टिव्ह असतात आणि प्रत्येक मुद्द्यावर त्यांचं मत असतं. मग तो राजकारणाचा असो वा व्यवसायाचा. ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांनी ट्विट केले की, “मी माझे नाव बदलून मिस्टर ट्वीट केले आहे. पण ट्विटर मला बदलू देत नाही.” हा विषय लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आणि लोकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली
Changed my name to Mr. Tweet, now Twitter won’t let me change it back ?
— Mr. Tweet (@elonmusk) January 25, 2023
So now i can change my name to Elon Musk? ?
— Ali Ahmad Awan (@AliAhmadAwan_) January 25, 2023
— Eric Italiano (@ericitaIiano) January 25, 2023
— darren i (@MegaDarren) January 25, 2023
but you didn’t lose your blue check mark like the rest of us! care to explain? ?
— Eva Savagiou (@evasavagiou) January 25, 2023
विशेष म्हणजे एलन मस्क यांनी विनोद म्हणून आपलं नाव बदललं आहे. खरं तर, एलन मस्क यांच्यावर खटला दाखल करणाऱ्या भागधारकांच्या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका वकिलाने त्यांना कोर्टात “मिस्टर ट्वीट” असे संबोधले. ज्यानंतर त्यांनी आपले अधिकृत हँडल याच नावाने ठेवले. एलन मस्क यांची कृती तुम्हाला नक्कीच थोडी विचित्र वाटेल कारण ट्विटर पॉलिसी अंतर्गत हे करणे शक्य नाही.