वीजबील वाढलं म्हणून कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला बोनस, कंपनीच्या निर्णयाने कर्मचारी खूश

ब्रिटनमधल्या एमरीज टिंबर अॅण्ड बिल्डर्स या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर जेम्स हिपकिंस यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. 37 लाख रूपये त्यांनी कर्मचाऱ्यांना देण्याचं ठरवलं.

वीजबील वाढलं म्हणून कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला बोनस, कंपनीच्या निर्णयाने कर्मचारी खूश
कंपनीच्या नफ्यातील काही रक्कम कर्मचाऱ्यांना देण्याबाबत निर्णय
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 6:08 PM

मुंबई : आपण ज्या संस्थेत काम करतो त्या कंपनीचा नफा वाढल्यास त्याचा आपल्याला फायदा व्हावा, असं अनेकांना वाटतं. कंपनीचे कर्मचारी (company staff) घेत असलेल्या कष्टांचा त्यांना मोबदला मिळावा, असं वारंवार बोललं जातं. कर्मचाऱ्यांचं हे स्वप्न एका कंपनीने सत्यात उतरवलंय. कंपनीच्या नफ्यात कर्मचाऱ्याचा मोठा वाटा आहे, असं म्हणत या कंपनीने कर्मचाऱ्यांना बोनस देऊ केला आहे. कंपनीच्या 60 कर्मचाऱ्यांमध्ये 37 लाख रूपये वाटण्यात आलेत. ब्रिटेनमधल्या एमरीज टिंबर अॅण्ड बिल्डर्स (Emeries Timber and Builders) या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर जेम्स हिपकिन्स (James Hipkins) यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. 37 लाख रूपये त्यांनी कर्मचाऱ्यांना देण्याचं ठरवलं. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात 62 हजार रूपय जमा झालेत. कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

कर्मचाऱ्यांना बोनस

ब्रिटनमधल्या एमरीज टिंबर अॅण्ड बिल्डर्स या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर जेम्स हिपकिन्स यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. 37 लाख रूपये त्यांनी कर्मचाऱ्यांना देण्याचं ठरवलं. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

“आपण सगळेच जाणतो की कोरोनामुळे सध्या सगळेच आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे कंपनीच्या नफ्यातील काही रक्कम कर्मचाऱ्यांना देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मागच्या काही आठवड्यात ब्रिटेनमध्ये वीजेच्या बिलात मोठी वाढ झाली. प्रत्येकाच्या लाईट बिलामध्ये साडे तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी आम्ही हे रक्कम देऊ करतोय. आम्हाला आशा आहे की तुम्ही या निर्णयाने खुश असाल. तुमच्यावरचा आर्थिक ताण कमी होईल. चांगला बॉस त्यालाच म्हणतात, जो कर्मचाऱ्यांच्या सुख, दुख:त सहभागी होतो. या आर्थिक संकटात मी तुमच्यासोबत आहे, खचू नका आपण सगळे हिमतीने या आर्थिक संकटातून बाहेर पडू आणि पुढे जाऊ”, असं जेम्स हिपकिन्स म्हणालेत.

ब्रिटनमध्ये सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. वीज बिलात तर साडे तीन टक्क्यांची वाढ पाहायला मिळतेय. अश्यात एमरीज टिंबर अॅण्ड बिल्डर्स या कंपनीने घेतलेला हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी मोठी मदत ठरतोय.

संबंधित बातम्या

Viral Video : “मै झुकुंगा नहीं साला…” चिमुकल्याचा व्हीडिओ व्हायरल, बघुन तुम्हीही म्हणाल, कमाल!

Nashik : एसटी बस बंद असल्यानं चक्क म्हशीवर स्वार होत चिमुरडी शाळेला निघाली! व्हिडीओ व्हायरल

Viral Video : जेव्हा आलिया भट रणबीरसाठी पिझ्झा ऑर्डर करते… व्हीडिओ पाहुन तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.