Video | अद्भूत आणि अजब ! जगातील सर्वात उंच इमारतीवर सुंदर महिला, धाडसाला नेटीझन्सचा सलाम !

मिरात एअरलाईन्सने आपल्या एका महिला क्रू मेंबरला जगातील सर्वात उंच असलेल्या बुर्ज खलीफा या इमारतीवर नेऊन एक जाहिरात शूट केली होती.

Video | अद्भूत आणि अजब ! जगातील सर्वात उंच इमारतीवर सुंदर महिला, धाडसाला नेटीझन्सचा सलाम !
Emirates Airline
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 11:32 PM

मुंबई : कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी अमिरात एअरलाईन्सने आपल्या एका क्रू मेंबरला जगातील सर्वात उंच असलेल्या बुर्ज खलिफा या इमारतीवर नेऊन एक जाहिरात शूट केली होती. या जाहिरातीमध्ये दिसणारी महिला बुर्ज खलिफा इमारतीवर म्हणजेच जमिनीपासून तब्बल 828 मीटर उंच गेली होती. या जाहिरातीचा व्हिडीओ नंतर चांगलाच व्हायरल झाला होता. आता याच जाहिरातीला शूट करण्यासाठी काय काय कारावं लागलं आहे ? हे सांगणारा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. (Emirates Airlines ad making and behind the scenes video went viral on social media)

जगातील सर्वात उचं इमारतीवर जाऊन शूट केली जाहिरात

अमिरात एअरलाईन्सने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही जाहिरात कोणत्याही स्पेशल इफेक्टविना शूट करण्यात आली. अमिरात एअरलाईन्सने जगातील सर्वात उंच असलेल्या बुर्ज खलिफा या इमारतीवर त्यांच्या एका महिला क्रू मेंबरला चढवले. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दाखण्यात आली आहे. तब्बल 828 मीटर उंचावर जायचं असल्यामुळे विशेष खबरदारी घेण्यात आली होती. महिला क्रू मेंबरच्या जीविताचा विचार करुन महिलेच्या मागे तिला आधार देण्यात आला होता. तसेच अपघात झालाच तर व्हिडीओतील महिला सुखरुप राहावी म्हणून तिला मागे बांधण्यात आले होते.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Emirates (@emirates)

स्काय डायव्हर असल्यामुळे निकोलला जाहिरातीसाठी निवडले

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेचे नाव निकोल स्मिथ-लुडविक (Nicole Smith-Ludvik) असे आहे. जाहिरातीसाठी निकोलचे नाव ठरवण्यासाठी सर्व बाबींचा विचार करण्यात आला होता. या जाहिरातीमध्ये एक प्रोफेशनल स्काय डायव्हर असावी असा निर्णय घेण्यात आला होता. याच कारणामुळे निकोलला या जाहिरातीसाठी निवडण्यात आले. याबद्दल बोलताना जेव्हा मी जगातील सर्वातं उंच ईमारतीच्या टोकाला होते, तो क्षण माझ्यासाठी सर्वोच्च होता, अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Emirates (@emirates)

व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक्

दरम्यान, या जाहिरातीचा मूळ व्हिडीओ इमिरात एअरलाईन्सने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केलेला आहे. ही जाहिरात समाजमाध्यमांवर आल्यानंतर एकच चर्चा झाली होती. त्यानंतर आता जाहिरात तयार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.

इतर बातम्या :

Viral | ढोल-ताशाचा आवाज ऐकून बेभान, जमिनीवर लोळून नाचायला लागला, नंतर बसला मार, व्हिडीओ व्हायरल

Video | कुत्र्यांना पळवून लावण्यासाठी वाघ, अस्वल झाले, नको त्या उचापत्या चांगल्याच भोवल्या; नेमकं काय घडलं एका पाहाच !

VIDEO : जपानी पोरींचा बॉलिवूडच्या गाण्यावर हटके डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

(Emirates Airlines ad making and behind the scenes video went viral on social media)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.