सोशल मीडिया एक असे व्यासपीठ आहे जिथं जे काही अपलोड केले जातं ते लगेच व्हायरल होतं. अनेकदा इंटरनेटवर, तुम्हा सर्वांना काही मजेदार ते गोंडस व्हिडिओ पाहायला मिळतील. हे व्हिडीओ असे आहेत की तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायला आवडेल. लहानपणापासून मुलांना जे संस्कार दिले जातात, ते ते आयुष्यभर सोबत करतात आणि आपल्या भावी पिढीलाही तेच शिकवतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी दिसत आहे आणि ती तिच्या जवळ पडलेल्या आजोबांना प्रेमाने जेवण खाऊ घालत आहे. (Emotional Video Your heart will melt after watching the video of the girl feeding the elderly )
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी बेडवर बसलेली दिसत आहे आणि तिच्याजवळ एक वृद्ध व्यक्तीही झोपलेली आहे. व्हिडीओ पाहून अंदाज बांधता येतो की, वृद्धांची स्थिती इतकी चांगली नसेल की, ते उठून खाऊ शकतात. तर पुढे व्हिडिओमध्ये ती मुलगी असे काम करते, ज्याने सर्व सोशल मीडिया यूजर्सचे तिने मन जिंकले आहे.
व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकता की, मुलगी काहीतरी खात आहे आणि काही क्षणांनंतर ती ते अन्न तिच्या जवळच्या वृद्धांना खायला देते. आई-वडिलांनी मुलाला दिलेले हे संस्कार सर्वांना खूप आवडले आहेत. प्रत्येकाला हा व्हिडिओ इतका आवडला आहे की, ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील शेअर करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. anna._.can या पेजवर तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ पाहू शकता. लोकांना हा व्हिडिओ किती आवडला आहे, याचा अंदाज तुम्ही व्हिडिओवरील व्ह्यूजवरून लावू शकता. या व्हिडिओवर हजारो कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.
लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, ‘मुलीला अप्रतिम संस्कार शिकवले आहेत’ दुसर्या यूजरने लिहिले, ‘मुले खूप हट्टी असतात, ते आधी वाईट गोष्टी शिकतात आणि चांगल्या गोष्टी नंतर शिकतात, पण हा व्हिडीओ खरंच खूप छान आहे’. या व्हिडीओवर लोक इमोजीही शेअर करत आहेत आणि त्यावरून त्यांच्या प्रतिक्रियेचा अंदाज येऊ शकतो.
हेही पाहा: