Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ghibli Style मध्ये फोटो तयार कणाऱ्यांसाठी वाईट बातमी, Open AI ने घेतला मोठा निर्णय

Ghibli Style मध्ये फोटो तयार करताना येत आहेत अडचणी, फोटो तयार कणाऱ्यांसाठी वाईट बातमी, Open AI ने घेतला मोठा निर्णय... सध्या सर्वत्र घिबली ट्रेंडची चर्चा...

Ghibli Style मध्ये फोटो तयार कणाऱ्यांसाठी वाईट बातमी, Open AI ने घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Mar 31, 2025 | 1:37 PM

Ghibli Art: ओपन आय कंपनीद्वारे विकसीत लोकप्रिय एआय चॅटबॉट चॅटजीपीटी वापरणाऱ्यांना रविवारी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चॅटजीपीटींचं एक्सेस डाऊन झाल्यामुळे युजर्समध्ये निराशा पाहण्यात आली. घिबली आर्टमुळे चॅटजीपीटींचं एक्सेस डाऊन झाल्याचं सांगण्यात आहे. चॅटजीपीटीमध्ये घिबली फोटो निर्माण करण्याचं प्रमाण वाढल्यामुळे चॅटजीपीटींचं एक्सेस डाऊन झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. पण याबद्दल डेव्हलपरने मोठी अपडेट दिली आहे. सर्व प्रभावित सेवा पूर्णपणे पुनर्संचयित केल्या गेल्या आहेत. पुढील अपडेट पाच दिवसांत कळेल असं देखील सांगितलं आहे.

शनिवारपासून यूजर त्रासले आहेत…

शनिवारी संध्याकाळपासून चॅटजीपीटीच्या युजर्सना अनेत संकटांचा सामना करावा लागत आहे. संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान अडचणींमध्ये मोठी वाढ झाली. कारण स्टुडिओ घिबली-शैलीतील ॲनिमेटेड फोटो तयार करण्यासाठी वापरकर्ते चॅटबॉट वापरत होते. यानंतर इंटरनेट मीडियावर यूजर्सच्या तक्रारी येऊ लागल्या.

सांगायचं झालं तर, एका रात्रीत घिबली आर्ट सर्वत्र ट्रेंड झाला आणि अनेकांनी फोटो तयार करण्यासाठी चॅटबॉटचा वापर करण्यास सुरुवात केली. दरम्यान आउटेज ट्रॅक करणाऱ्या कंपनीने सांगितलं की, 229 युजर्सने तक्रार दाखल केली आहे. ज्या तक्रारी दाखल झाल्या आहेत, त्यामध्ये जवळपास 59 तक्रारी या चॅटजीपीटी संबंधीत आहेत.

यावर ओपनआय कंपनीचे सीईओ सॅम आल्टमॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, वापर वाढल्यामुळे जीपीयूवर दबाव पडल्याने अडचणी येत आहेत. काही कालावधीसाठी फोटो तयार करण्याची संख्या मर्यादीत ठेवण्यात येणार आहे. ChatGPT च्या मोफत वापरकर्त्यांना लवकरच दररोज तीन फोटो तयार करण्याची परवानगी दिली जाईल.

काय आहे घिबली स्टाईल फोटो?

नुकताच ओपन एआयने चॅटजीपीटी प्लस, प्रो आणि टीम वापरकर्त्यांसाठी इमेज जनरेशन फीचर लाँच केलं. ज्यामुळे इंटरनेटवर नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमचे खरे फोटो जपानच्या प्रसिद्ध स्टूडिओ घिबलीच्या एमीनेटेड स्टाईलमध्ये करु शकता.

सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट.
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं.
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप
ही सवय खूप घाण, औरंगजेबासोबत मुंडेंची तुलना? करूणा शर्मांचा गंभीर आरोप.