Facebook Down | पोस्ट करण्यास अडचणी, फेसबुक डाऊन? जगभरातील युजर्समध्ये खळबळ
जगभरातील कोट्यवधी नेटीझन्सचं आवडतं सोशल प्लॅटफोर्म फेसबुक अचानक डाऊन झाल्याची चर्चा सुरु झालीय. फेसबुकवर पोस्ट करण्यास अनेकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जगभरातील युजर्समध्ये खळबळ उडाली आहे.
मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : जगभरातील कोट्यवधी नेटीझन्सचं आवडतं सोशल प्लॅटफोर्म असलेलं फेसबुक अचानक डाऊन झाल्याची चर्चा सुरु झालीय. फेसबुकवर पोस्ट करण्यास अनेकांना अडचणी येत आहेत. फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर “ऑप्स… काहीतरी गडबड झालीय. आम्ही अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतोय”, असा मेसेज येत आहे. त्यामुळे फेसबुक डाऊन असल्याच्या चर्चांना जास्त उधाण आलंय. फेसबुककडून याबाबत अधिकृत असा दुजोरा देण्यात आलेला नाही. पण ट्विटरवर (X) वर फेसबुक डाऊन म्हणून पोस्ट पडायला लागल्या आहेत. अनेकांकडून फेसबुक डाऊन आहे का? अशी विचारणा केली जातेय.
फेसबुकवर युजर्सला रात्री साडेनऊ वाजेपासून अडचणी येत आहेत. त्यानंतर लगेच ट्विटरवर अनेकांनी याची खातरजमा करण्यासाठी पोस्ट केलीय. तर काही जणांनी फेसबुक डाऊन झाल्यानंतर काही मजेशीर ट्विट देखील केले आहेत. फेसबुक डाऊन झाल्यानंतर सर्व युजर्स ट्विटरवर कसे येतात? याबाबत विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आलंय.
Me coming to Twitter when Facebook is down #facebookdown pic.twitter.com/tICigd6rbV
— Michael (@americanmikey_) October 18, 2023
फेसबुक डाऊन झाल्याने अनेक मोठमोठ्या कंपन्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होतं. कारण या कंपन्या फेसबुकवर बिझनेस करतात. त्यांच्या बिझनेसला फेसबुक डाऊनचा फटका बसतो. या कंपन्या वेगवेगळे व्हिडीओ शेअर करतात. हे व्हिडीओ कोट्यवधी युजर्स पाहतात. त्याच्यावर प्रतिक्रिया देतात. त्यातून या कंपन्यांना जाहिराती मिळतात. या जाहिरातीतून कोट्यवधींची उलाढाल होते. त्यामुळे या कंपन्यांचं नक्कीच फेसबुक डाऊनमुळे नुकसान होतं.
युजर्समध्ये संभ्रम
फेसबुक डाऊन होण्याची घटना याआधी देखील घडली आहे. याशिवाय युट्यूबदेखील डाऊन झाल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. काही मिनिटांनंतर तांत्रिक अडचणी दूर होतात आणि आधी सारखं सर्व कामकाज चालतं. पण दरम्यानच्या काळात युजर्सचा भ्रमनिरास होतो. अनेक युजर्सला आपल्या मनातील वेगवेगळ्या गोष्टी फेसबुकवर शेअर करायच्या असतात, कुणाला फेसबुक लाईव्ह करायचं असतं. अशा युजर्सला या गोष्टींमुळे फटका बसतो.
दरम्यान, फेसबुक डाऊनच्या बातमीवर फेसबुककडून अधिकृत अशी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. याआधी फेसबुकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता फेसबुक काय भूमिका मांडतं किंवा फेसबुक खरंच डाऊन आहे की नाही? याबाबत युजर्समध्ये संभ्रम निर्माण झालंय.