Indian Railways रोज रेल्वेचे डब्बे मोजायचे होते, पगार खिशात आला नाही तेव्हा लक्षात आलं…
28 जण रेल्वे स्थानकाच्या विविध प्लॅटफॉर्मवर सुमारे एक महिना रोज 8 तास रेल्वे गाड्या आणि त्यांचे डबे मोजत होते.
तामिळनाडूतील किमान 28 जण नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या विविध प्लॅटफॉर्मवर सुमारे एक महिना रोज आठ तास रेल्वे गाड्या आणि त्यांचे डबे मोजत होते. हे त्यांचे काम आहे, असे त्यांना सांगण्यात आले. नोकरीच्या नावाखाली आपण फसवणुकीचे बळी ठरलो आहोत, याची त्यांना कल्पना नव्हती. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (ईओडब्ल्यू) दाखल केलेल्या तक्रारीनुसार, या 28 जणांना सांगण्यात आले की, ट्रॅव्हल तिकीट परीक्षक (टीटीई), वाहतूक सहाय्यक आणि लिपिक या पदांसाठी असं करणे हा त्यांच्या प्रशिक्षणाचा हा एक भाग आहे. रेल्वेत नोकरी मिळावी यासाठी प्रत्येकाने दोन लाख ते 24 लाख रुपयांपर्यंतची रक्कम भरली होती.
78 वर्षीय एम सुब्बुसामी यांनी ही तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, जून ते जुलै दरम्यान महिनाभर एक प्रशिक्षण घेण्यात आलं, या एक महिन्यात या 28 जणांची फसवणूक झाली. फसवणूक करणाऱ्या एका गटाने 2 कोटी 67लाख रुपयांची फसवणूक केली.
सुब्बुसामी या माजी सैनिकाने पीडितांना कथित फसवणूक करणाऱ्यांच्या संपर्कात आणले होते, परंतु हा सर्व घोटाळा आहे याची त्यांना कल्पना नव्हती आणि तेही त्यांच्या जाळ्यात अडकले होते, असा दावा त्यांनी केला.
मदुराई येथील 25 वर्षीय पीडित स्नेहल कुमार यांनी सांगितले की, “प्रत्येक उमेदवाराने विकास राणा नावाच्या व्यक्तीला पैसे देणाऱ्या सुब्बुसामीला 2 लाख ते 24 लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली. राणा यांनी दिल्लीतील उत्तर रेल्वे कार्यालयात उपसंचालक म्हणून स्वत:ची ओळख करून दिली,’ असे राणा म्हणाले.
राणा म्हणाले की, ‘बहुतांश पीडित हे अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षणाची पार्श्वभूमी असलेले पदवीधर आहेत.” तमिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील सुब्बुसामी ज्यांनी ही तक्रार दाखल केली होती ते म्हणतात, “माझ्या सेवानिवृत्तीपासून मी माझ्या परिसरातील बेरोजगार तरुणांना कोणत्याही आर्थिक हिताशिवाय योग्य नोकरी शोधण्यात मदत करत आहे.”
एफआयआरमध्ये सुब्बुसामी असा आरोप केला आहे की ते कोयंबतूरचे रहिवासी शिवरामन नावाच्या एका व्यक्तीला दिल्लीतील एका एमपी क्वार्टरमध्ये भेटले.
शिवरामन यांनी खासदार आणि मंत्र्यांशी आपली ओळख असल्याचा त्याचबरोबर आर्थिक लाभाच्या बदल्यात बेरोजगारांना रेल्वेत नोकरी देऊ शकतो दावा केला. त्यानंतर सुब्बुसामी तीन नोकरी शोधणाऱ्यांसह दिल्लीला आले.