प्रेतयात्रा स्मशानात पोहोचली, प्रेत उठून बसलं, मग त्याने सांगितला किस्सा
जेव्हा तुम्ही ही गोष्ट वाचाल तर तुम्हालाही धक्का बसेल. एका माणसाने असं काही केलंय की त्या गोष्टीची सगळीकडेच चर्चा आहे.
कल्पना करा की तुम्ही एखाद्याच्या अंत्ययात्रेला गेलात आणि तो जो माणूस ज्याचं निधन झालंय तोच जर विधी सुरु असताना उठून बसला तर? हे किती भयानक आहेना. पण जेव्हा तुम्ही ही गोष्ट वाचाल तर तुम्हालाही धक्का बसेल. एका माणसाने असं काही केलंय की त्या गोष्टीची सगळीकडेच चर्चा आहे.
ही घटना ब्राझीलमधील एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाल्टझार लेमोस असं या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीने त्याच्या मृत्यूचे खोटे नाटक रचले आणि आधी त्याच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली, नंतर त्याची खोटी अंत्ययात्रा काढली. इतकंच नाही तर त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी लोक ही मोठ्या संख्येने तिथे पोहोचले होते.
कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींची परीक्षा घेण्यासाठी त्याने हे कृत्य केले. त्याला तिथे पाहून लोक संतापले तेव्हा त्याने सर्व किस्सा लोकांसमोर सांगितला. “माझ्या मृत्यूनंतर किती लोक बाहेर येतील आणि किती जण माझ्या अंत्ययात्रेला उपस्थित राहतील, हे मला जाणून घ्यायचं होतं,” असं तो म्हणाला. आपल्या कुटुंबाची आणि मित्रांची परीक्षा घेण्यासाठी त्याने जिवंत असताना आपली बनावट अंत्ययात्रा काढली.
त्या व्यक्तीचे हे कृत्य ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे फेसबुकवर या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी पसरली होती आणि त्याचा एक फोटो पोस्ट करून बाल्टाझर लेमोस निघून गेल्याची माहिती देण्यात आली होती.