अबब! 1158 किलोचा भोपळा, शेतकऱ्याचा नाद नाय!

एका मीडिया रिपोर्टनुसार या उत्पादनासाठी शेतकऱ्याचा गौरव करण्यात आलाय आणि त्याला बक्षीसही देण्यात आलंय.

अबब! 1158 किलोचा भोपळा, शेतकऱ्याचा नाद नाय!
Pumkin creates recordImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 1:56 PM

भाज्या किंवा फळांचा आकार नेहमीपेक्षा मोठा असणं असं बरेचदा दिसून येतं. अशा गोष्टी अनेकदा व्हायरल सुद्धा होतात. माणूस खूप प्रयोगशील आहे. असे प्रयोग करून करून बऱ्याच गोष्टी नवीन तयार होतात आणि त्या व्हायरल सुद्धा होतात. बरेचदा भाज्यांचा, फळभाज्यांच्या आकार इतका मोठा असतो की त्याचा विक्रम होतो. असाच एक प्रकार समोर आलाय एका शेतकऱ्याने 1158 किलोचा एक भोपळा पिकवला. हा भोपळा प्रदर्शनात ठेवण्यात आलाय.

हा भोपळा अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्कॉट अँड्र्यूज असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्याने संपूर्ण उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा भोपळा पिकवण्याचा विक्रम मोडीत काढलाय.

स्वत: शेतकऱ्याने असा पराक्रम कसा केला हे सांगितले. एवढेच नव्हे तर शेतकऱ्याचा हा भोपळा जगातील सर्वात मोठ्या भोपळ्याच्या विक्रमाच्या तुलनेत काहीसा मागे होता, अन्यथा विश्वविक्रम या शेतकऱ्याच्या नावावर झाला असता.

एका मीडिया रिपोर्टनुसार या उत्पादनासाठी शेतकऱ्याचा गौरव करण्यात आलाय आणि त्याला बक्षीसही देण्यात आलंय.

न्यूयॉर्क येथे झालेल्या ‘द ग्रेट ब्लोपली फार्म’मध्ये वार्षिक जागतिक भोपळ्याच्या वजन स्पर्धेत शेतकरी भोपळ्याचे वजन मोजले गेले, त्यानंतर ते 2554 पौंड (सुमारे 1158 किलो) असल्याचे निष्पन्न झाले. त्यासाठी शेतकऱ्याला प्रमाणपत्र व 5500 अमेरिकन डॉलरची बक्षिसाची रक्कम देण्यात आली.

शेतकरी म्हणाला की, तो वेळोवेळी भोपळा आणि फणसाची लागवड करतो. हे भोपळ्याचे बीज घेण्यापूर्वी त्याने ठरवले होते की यावेळी मोठ्या आकाराच्या भोपळ्याचे बीज घ्यायचे.

उत्तम खत, वेळोवेळी त्याच्या वेली, इतर गोष्टी कापत राहणे, काळजी घेणे या सगळ्यानेच हे शक्य झाल्याचं शेतकऱ्याने सांगितलं.

कीटक, बुरशी आणि मांजरी सारख्या प्राण्यांपासून भोपळ्याचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचेही या शेतकऱ्याने सांगितले. हा महाकाय भोपळा 16 ऑक्टोबरपर्यंत न्यूयॉर्कमधील क्लॅरेन्स मधील ग्रेट भोपळ्याच्या फार्ममध्ये प्रदर्शित होणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.