शेतकऱ्याचा नाद नाय करायचा! कार विकणारा म्हणाला, खिशात 10 रुपये आहेत का? पठ्ठ्यानं शर्थ लावून जिरवली, नेमकं काय घडलं?

कार विकणाऱ्या कर्मचाऱ्याला शेतकऱ्याची अवहेलना करणं महागात पडलं आहे. खिशात पैसे नसताना कार खरेदी करायला आला, असं म्हणणारा कर्मचारी शेतकऱ्याच्या धाडसाला पाहून अवाक् झाला आहे. शेतकऱ्याने अवघ्या 30 मिनिटात तब्बल 10 लाख रुपये जमवले आहेत.

शेतकऱ्याचा नाद नाय करायचा! कार विकणारा म्हणाला, खिशात 10 रुपये आहेत का? पठ्ठ्यानं शर्थ लावून जिरवली, नेमकं काय घडलं?
याच शेतकऱ्याने दहा लाख रुपये तीस मिनिटांत आणले होते.
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 9:22 AM

तुमाकुरू : असं म्हणतात की शेतकऱ्याचा (Farmer) नाद करायचा नसतो. शेतकरी कधी काय करेल हे सांगता येत नाही. मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याकडे प्रचंड इच्छाशक्ती आणि धाडस असतं. मात्र याच शेतकऱ्याला नेहमीच कमजोर समजलं जातं. आर्थिक दृष्टीकोनातून तर शेतकरी म्हणजे अत्यंत गरीब वर्ग आहे, असे हमखास म्हटले जाते. याच समजातून कार विकणाऱ्या कर्मचाऱ्याला शेतकऱ्याची अवहेलना करणं महागात पडलं आहे. खिशात पैसे नसताना कार खरेदी करायला आला, असं म्हणणारा कर्मचारी शेतकऱ्याच्या धाडसाला पाहून अवाक् झाला आहे. शेतकऱ्याने अवघ्या 30 मिनिटात तब्बल 10 लाख रुपये जमवले. तसेच कार विकणारा (Car Purchasing) कर्मचारी आणि दुकानदाराला त्याने माफी मागायला लावली आहे. कर्नाटक राज्यातील तुमाकुरु येथे हा प्रकार घडला असून टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

कर्मचारी म्हणाला खिशात दहा रुपये आहेत का ?  

मिळालेल्या माहितीनुसार केम्पेगौडा आर. एल. हा शेतकरी आपल्या मित्रांसोबत तुमाकुरु येथील एका कारच्या शोरुमध्ये कार खरेदी करण्यासाठी गेला. हा शेतकरी चिक्कसांद्र होबळी येथील रामनपल्या येथील आहे. मात्र कार खरेदी करण्यासाठी गेलेला हा शेतकरी वेळ घालवण्यासाठी तसेच मस्करी म्हणून दुकानात शिरला असावा, असा समज येथील कार विकाणाऱ्या कर्मचाऱ्याचा झाला. याच कारणामुळे कर्मचाऱ्याने केम्पेगौडा यांना दुकानातून हाकलून दिले. तसेच खिशात दहा रुपये नाहीत, पण कार खरेदी करायला निघाला, असे म्हणत हिणवले. याच गोष्टीचा राग धरत शेतकऱ्याने जिद्दीला पेटून अवघ्या 30 मिनिटात तब्बल 10 लाख रुपये कर्मचाऱ्याच्या समोर आणून टाकले. शुक्रवारी हा सर्व प्रकार घडला.

कर्मचाऱ्याला मागायला लावली माफी 

कर्मचाऱ्याने हिणवल्यामुळे शेतकऱ्याच्या जिव्हारी लागले होते. त्यानंतर कर्मचारी आणि शेतकरी यांच्यात पैज लागली. तिस मिनिटाच्या आत पैसे आणले तर अपमान केलेल्या कर्मचाऱ्यालाच शेतकऱ्याच्या घरी कार आणून लावावी लागेल, असे पैजेमध्ये ठरले. दिलेल्या वेळेत शेतकऱ्याने पैसे आणूनदेखील दिले. मात्र शनिवार आणि रवीवार हे शासकीय सुट्टीचे दिवस असल्यामुळे ठरल्यानुसार कार विकणाऱ्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला कार दिली नाही. याच कारणामुळे केम्पेगौडा आणि त्यांचे मित्र रागावले आहेत. त्यांनी थेट पोलिसांना बोलवत आपली बदनामी झाल्याची तक्रार नोंदवायला सांगितली. तसेच जोपर्यंत कर्मचारी माझी माफी मागत नाही तोपर्यंत कारचे शोरुम सोडून जाण्यास नकार दिला. त्यानंतर शेतकऱ्याला घरी जाण्याचे सांगण्यासाठी टिळक पार्क येथील पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

…तर दुकानासमोर आंदोलन करु 

दरम्यान, शेतकऱ्यांनी कारच्या शोरुमकडे लेखी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसेच आता मला यांची कार खरेदी करण्यात काहीही स्वारस्य राहिलेले नाही, अशी शेतकऱ्याने प्रतिक्रियी दिलीय. तसेच माफी मागितली नाही तर शोरुमसमोर आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्याने दिलाय.

इतर बातम्या :

नागपुरातील ‘हंगामा डान्स’ प्रकरणात फास आवळला, पोलिसांनी आणखी 8 जणांना ठोकल्या बेड्या, पाळमुळं आणखी खोल ?

नवजात बाळांना विकणारी टोळी अखेर गजाआड, 2.75 लाखात बाळाची विक्री, काय होती मोड्स ओपरेंडी?

Video | कधी काळी फ्लाईंग किस जायचा, आता बॅटचाच पाळणा झाला! युजर्स म्हणाले ‘शेवटी बापाचं काळीजए!’

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.