माशाचे वजन 70 किलो, लांबी 7 फूट!
हा मासा पकडण्यासाठी बाप-लेकाला 70 तासांहून अधिक वेळ लागला. मच्छिमार कीथ डीस आणि त्याच्या मुलाने त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच तो व्हायरल झाला.
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पृथ्वीचा एक मोठा भाग अद्याप त्यांच्या आवाक्याबाहेर आहे, जिथे बरेच जीव अस्तित्वात असू शकतात ज्याबद्दल त्यांना काहीही माहित नाही. कधी कधी हे जीव अचानक पुढे येऊन आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. हा मासा एलिगेटर गर फिश या नावाने ओळखला जातो. या माशाचे वजन सुमारे ७० किलो असून लांबी सुमारे ७ फूट आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही माशांची प्रजाती डायनासोरपेक्षा जुनी आहे. विशेषत: गोड्या पाण्यातील नद्यांमध्ये एलिगेटर गारफिश आढळतात. हा मासा पकडण्यासाठी बाप-लेकाला 70 तासांहून अधिक वेळ लागला. मच्छिमार कीथ डीस आणि त्याच्या मुलाने त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच तो व्हायरल झाला.
या माशाचे दात एलिगेटरसारखे दिसत असल्याने त्याला एलिगेटर गर फिश असे म्हणतात. याखेरीज त्यांचा मगरीशी दुसरा कोणताही संबंध नसतो. त्यांची जास्तीत जास्त लांबी १० फुटांपर्यंत असू शकते आणि ते खाण्यासाठी पाण्याजवळ उडणारे मासे, प्राणी आणि पक्ष्यांची शिकार करतात. काही वेळा हे मासे कासवांची शिकारही करतात.
बाप-लेकाच्या हातात हा मासा आला तेव्हा तो पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. अलाबामा संरक्षण आणि नैसर्गिक संसाधन विभागाने सांगितले की कीथ डीस आणि त्यांच्या मुलाकडे आतापर्यंतची सर्वात मोठी एलिगेटर गर फीश आहे.
पूर्वीचा विक्रम ११ पौंड होता, तर यंदा मासा १६२ पौंड आहे. एलिगेटर गरला पकडल्यानंतर बाप-लेकाची जोडी सोशल मीडियावर सेलिब्रिटी बनली असून त्यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे.