बाप बेटी ची जोडीच न्यारी! लोकं बघतच राहिले, इंटरनेटवर धुमाकूळ
20 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील गाण्यांवर वडील-मुलीची जोडी एकत्र थिरकताना या व्हिडिओत दिसत आहे.
लग्न हा खरंच कोणासाठीही आयुष्यातला मोठा दिवस असतो आणि आपला मोठा दिवस अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी कुणीही कसर सोडत नाही. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वधू आपल्या लग्नाच्या दिवशी वडिलांसोबत डान्स करत आहे. 20 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील गाण्यांवर वडील-मुलीची जोडी एकत्र थिरकताना या व्हिडिओत दिसत आहे. मुलगी बॅक टू बॅक डान्स स्टेप्स करत असतानाच वडिलांनीही एनर्जीटिक डान्सने लोकांना वेड लावलं. वडिलांचा हा डान्स पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं, कारण त्यांचं वय 60 ते 70 वर्षं आहे, पण त्यांनी एक स्टेप सुद्धा चुकवली नाहीये.
ब्रिटनी रेवेल नावाच्या इन्स्टाग्राम युजरने कॅप्शनसह हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. “मिडल स्कूलमधून माझ्या वडिलांना माझ्या काही गो-मूव्ह्स शिकवण्यात किती मजा आली हे मी सांगू शकत नाही.”
वधू आणि तिच्या वडिलांच्या धडाकेबाज डान्सने पाहुण्यांची मने जिंकली. नृत्यातील सिंक्रोनायझेशन पाहून सर्वांनाच धक्का बसलाय.
हा व्हिडिओ गेल्या महिन्यात 21 ऑगस्ट रोजी पोस्ट करण्यात आला होता आणि त्यानंतर त्याला 30 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
View this post on Instagram
एका इन्स्टाग्राम युझरने लिहिले की, “मला हा व्हिडिओ खूप आवडला! सध्या हा व्हिडीओ सर्वांचा बाप आहे. तुला आणि तुझ्या कुटुंबाला खूप प्रेम!
आणखी एका युझरने लिहिले की, ” मी घरी कोविड-19 मुळे आजारी आहे आणि मी तुमच्या वडिलांचा एक व्हिडिओ पाहिला आहे. मला खूप आनंद झाला”.