महिलेच्या पोटात 35 वर्षापासून भ्रूण! 2 किलो वजनाचा स्टोन बेबी पाहून डॉक्टर्सही हैराण
'द सन'मधील बातमीनुसार, या पूर्वीही या महिलेवर उपचार करण्यात आले आहेत. मात्र, डॉक्टरांना त्याबाबत माहिती मिळाली नव्हती. मात्र, यावेळी महिलेला पोटाचा त्रास जाणवू लागल्यानंतर ती डॉक्टरकडे गेली. तेव्हा तपासणी करण्यात आल्यानंतर तिच्या गर्भात एक भ्रूण असल्याचं लक्षात आलं.
मुंबई : अल्जीरियामधील 73 वर्षीय महिलेच्या गर्भात स्टोन बेबी (Stone Baby) आढळून आला आहे. एक्स-रे केल्यानंतर डॉक्टरांना याबाबत माहिती मिळाली. हा स्टोन 35 वर्षापासून महिलेच्या गर्भात (Womb) होता. तपासणी केल्यानंतर हा स्टोन म्हणजे सात महिन्याचं एक भ्रूण असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं.
‘द सन’मधील बातमीनुसार, या पूर्वीही या महिलेवर उपचार करण्यात आले आहेत. मात्र, डॉक्टरांना त्याबाबत माहिती मिळाली नव्हती. मात्र, यावेळी महिलेला पोटाचा त्रास जाणवू लागल्यानंतर ती डॉक्टरकडे गेली. तेव्हा तपासणी करण्यात आल्यानंतर तिच्या गर्भात एक भ्रूण असल्याचं लक्षात आलं.
4.5 पौंड अर्थात साधारण दोन किलो वजनाचं हे भ्रूण 35 वर्षापासून त्या महिलेच्या पोटात होतं. मात्र, या भ्रूणामुळे त्या महिलेला कुठली कायमस्वरुपी इजा झाली नाही. फक्त कधी-कधी पोटात दुखत असल्याची त्या महिलेची तक्रार होती.
लिथोपेडीयनमध्ये नेमकं काय घडतं?
डॉक्टरांनी याला लिथोपेडीयन म्हटलं आहे. तसंच हे त्यावेळी घडतं जेव्हा प्रेगन्सी गर्भाशयाऐवजी पोटात बनते, असंही डॉक्टरांनी सांगितलं. साधारणपणे प्रेगन्सीमध्ये रक्ताची कमतरता राहते तेव्हा भ्रूण विकसित होत नाही. तेव्हा शरीराकडे भ्रूण बाहेर काढण्याशिवाय दुसरा कुठला मार्ग राहत नाही. त्यानंतर शरीर इम्यून प्रोसेसचा उपयोग करुन भ्रूण हळूहळू दगड अर्थात स्टोनमध्ये बदलतो. त्यामुळेच महिलेच्या पोटात मिळालेल्या भ्रूणला स्टोन बेबी असं म्हणतात.
लिथोपेडियनचे आतापर्यंत फक्त 290 केसेस
क्लीवलॅन्डमधील विद्यापीठ हॉस्पिटल केस मेडिकल सेंटरचे (University Hospital Case Medical Center) डॉक्टर किम गार्सी (Dr. Kim Garcsi) यांचं म्हणणं आहे की, टिशू कॅल्सीफिकेशन (Calcification) आईला अन्य संक्रमणापासून वाचवतो आणि तो दगड अनेक वर्षे पोटात राहतो. त्यांनी सांगितलं की अधिक करुन लोक ते शोधतात आणि सापडल्यानंतर ते हटवत नाहीत. जर्नल ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन 1996 मधील एका पत्रानुसार लिथोपेडियनचे आतापर्यंत फक्त 290 केसेस आढळून आल्या आहेत.
इतर बातम्या :