हिरोईन स्कुटर घेऊन थेट चंद्रावर! Avangers सुद्धा फेल होईल असं हे दृश्य, प्रचंड ट्रोल!
आता तर त्या नागमणी, नाग,नागीण अशा सीरिअल्स आल्यात. यातली सुंदर नायिका बोलता बोलता मध्येच नागीण होते. एकदा तर एक सीन व्हायरल झाला होता ज्यात नायक चंद्रावर दोर टाकतो आणि तो खेचायचा प्रयत्न करतो. हे दृश्य इतकं हास्यास्पद होतं की लोकांनी याला प्रचंड ट्रोल केलं होतं.
मुंबई: भारतीय सिरियल्स बरेचदा चर्चेचा विषय ठरतात. कधी कधी इतके विचित्र सीन्स असतात की ते फेसबुक वर प्रचंड व्हायरल होतात. लोकंही या अशा सीन्सला खळखळून हसतात. आता तर अशा सीरिअल्स आल्या आहेत की प्रश्न पडतो ह्यांना मोटिव्हेशन मिळतं कुठून? हॉलिवूड मधून? बरं त्या हॉलिवूड सोबत तुलना करता करता त्या सीन्स ची वाट लागते. कधी सीरिअल मधला नायक मध्येच राक्षस काय बनतो, मध्येच नाग बनतो. या सीरिअल्स ने लोकांना अक्षरशः बऱ्याच गोष्टी दाखवल्यात. आता तर त्या नागमणी, नाग,नागीण अशा सीरिअल्स आल्यात. यातली सुंदर नायिका बोलता बोलता मध्येच नागीण होते. एकदा तर एक सीन व्हायरल झाला होता ज्यात नायक चंद्रावर दोर टाकतो आणि तो खेचायचा प्रयत्न करतो. हे दृश्य इतकं हास्यास्पद होतं की लोकांनी याला प्रचंड ट्रोल केलं होतं.
आता हा व्हायरल झालेला व्हिडीओ पण असाच काहीसा आहे. हा व्हिडीओ बघा. ‘इश्क की दास्तान-नागमणि’ ही दंगल नावाच्या चॅनलवर असणारी सीरिअल. या सीरिअलचं हे दृश्य प्रचंड व्हायरल झालंय. या दृश्यात ही नायिका स्कुटर घेऊन चंद्रावर जातेय. ही नायिका खरं तर एक नागीण असते. तिचा नवरा आणि मूल एका उपग्रहावर अडकलेलं असतं तर त्यांना वाचविण्यासाठी ही नायिका स्कुटर घेऊन थेट चंद्रावर जाते. आता हे दृश्य लोकांनी प्रचंड ट्रोल केलंय. ग्राफिक्सचा अतिवापर, उगाचच वाढीव गोष्टी या दृश्यात दाखवल्या गेल्यात.
View this post on Instagram
@aclearrecord नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केलाय. हा सीन 1 जुलै रोजी प्रसारित झालेल्या शोच्या एपिसोड नंबर 330 मधून घेण्यात आला होता. या व्हिडीओसोबत कॅप्शनही लिहिलं होतं- “हे दृश्य पाहून अंतराळवीर कोपऱ्यात रडतोय.” हा व्हिडीओ बघून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या, “ती हेडलाईट चालू करायला विसरली, लाईट शिवाय रात्री गाडी चालवायला त्रास झाला असेल” असं म्हटलंय. मार्च 2021 मध्ये स्टार प्लसवरील ‘ये जादू है जिन का’ या मालिकेतील एका दृश्यात नायक आपल्या प्रेयसीला चंद्राचा तुकडा देण्यासाठी तो चंद्र तोडण्याचा प्रयत्न करताना दिसलाय. हा चंद्र तो अक्षरशः दोरीने खेचून तोडण्याचा प्रयत्न करतोय. हे दृश्य प्रचंड व्हायरल झालं होतं.