शेवटी सिंहिणसुद्धा एक आई असते; हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की म्हणाल ‘माँ, तुझे सलाम’

गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक सिंहिण तिच्या पिल्लाला रानटी कुत्र्यांच्या कळपापासून वाचवत असल्याचे दाखवले आहे. (Finally the lioness is also a mother; After watching this video)

शेवटी सिंहिणसुद्धा एक आई असते; हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की म्हणाल 'माँ, तुझे सलाम'
शेवटी सिंहिणसुद्धा एक आई असते; हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की म्हणाल 'माँ, तुझे सलाम'
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 12:51 AM

नवी दिल्ली : आई केवळ ममताच नव्हे तर शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असते. कारण मुलाचे रक्षण आईसारखे कोणीही करू शकत नाही. मायलेकरांमधील हे प्रेम केवळ मानवांमध्ये आहे, असे नाही तर प्राणीही त्यांच्या पिल्लांवर खूप प्रेम करतात. पिल्लांच्या संरक्षणासाठी आपला जीवही धोक्यात घालतात. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक सिंहिण तिच्या पिल्लाला रानटी कुत्र्यांच्या कळपापासून वाचवत असल्याचे दाखवले आहे. (Finally the lioness is also a mother; After watching this video)

काय आहे व्हिडिओमध्ये?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की एका सिंहिणीचे पिल्लू जंगली कुत्र्यांच्या कळपामध्ये वेढले गेलेले आहे. अशावेळी त्या पिल्लाची आई अर्थात त्या सिंहिणीची प्रचंड घालमेल होत आहे. तिला आपल्या मुलाचा जीव धोक्यात आल्याचे पाहून प्रचंड असह्य होते आणि ती ओरडत राहते. परंतु यानंतरही रानटी कुत्री त्या पिल्लावर हल्ला करण्याची संधी शोधत असतात. रानटी कुत्रे त्या पिल्लाकडे धाव घेताच सिंहिणीने त्या कुत्र्यांवर हल्ला केला. सिंहिण प्रथम एक कुत्रा पकडते. पण अल्पावधीतच सर्व रानटी कुत्री सिंहिणीवर हल्ला करतात. परंतु असे असूनही सिंहिण हार मानत नाही. तिने जंगली कुत्र्यांशी लढा सुरु ठेवला, जेणेकरून आपल्या पिल्लाला काहीही होणार नाही. निव्वळ पिल्लावरील प्रेमापोटी तिने स्वतःचाही जीव धोक्यात घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सोशल मीडियात भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडिओवर सोशल मीडियात चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक भन्नाट प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका युजरने लिहिले की, त्याला आई म्हणतात. प्रत्येक धोक्याशी लढा देत, तिने आपल्या मुलाचे जीवन वाचवण्यासाठी आपले जीवनही धोक्यात घातले. त्याचवेळी दुसर्‍या युजरने लिहिले आहे की आईसारखे कोणी नाही. हा व्हिडिओदेखील हीच गोष्ट सिद्ध करीत आहे. आणखी एका युजरनेसुद्धा आईच्या प्रेमाचा थोरवी गायली आहे. त्याने लिहिले की आईच्या प्रेमाची आणि सामर्थ्याची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही. याव्यतिरिक्त अनेक लोकांनी त्यांच्या स्वत:च्या शब्दांतून आईच्या धैर्यावर भाष्य केले आहे.

big_cat__namibia या पेजवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ दोनच दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडिओ खूप लोकांकडून पसंती मिळवत आहे. अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. (Finally the lioness is also a mother; After watching this video)

इतर बातम्या

अडचणी येत असतील तर इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मी स्वत: बोलेन, पण ‘हे’ प्रकल्प वेगाने पूर्ण करा : उद्धव ठाकरे

‘या’ बँकेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, संपूर्ण बँकच विकणार, आता ग्राहकांचे काय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.