बघू तुमची दृष्टी किती वेगवान…लपलेले शब्द ओळखा!
ते तीन शब्द काय आहेत हे सांगणे एक आव्हान आहे. तसं पाहता 99 टक्के लोक हा शब्द वाचण्यात अपयशी ठरल्याचा दावा केला जातोय.
सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असाल तर कधी तरी ऑप्टिकल इल्युजनसारख्या शब्दाला सामोरे जावे लागले असेल. होय. हे तेच आहे. यात काहीतरी दडलेलं असतं आणि ते शोधण्यासाठी प्रचंड एकाग्रता लागते. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्युजन सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. ज्यात तीन शब्द इंग्रजीत लिहिले आहेत, पण लोकांना हे समजत नाही. ते तीन शब्द काय आहेत हे सांगणे एक आव्हान आहे. तसं पाहता ९९ टक्के लोक हा शब्द वाचण्यात अपयशी ठरल्याचा दावा केला जातोय. चला तर मग पाहूया की तुमची दृष्टी किती वेगवान आहे.
ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटोजचे अनेक प्रकार आहेत. हे स्केच अनेक रंगांचे मिश्रण असू शकते जे लोकांच्या डोळ्यांत, डोक्यात गोंधळ निर्माण करते.
लाख प्रयत्न करूनही छुप्या गोष्टी सहज पाहता येत नाहीत. आम्ही आता तुमच्यासाठी असं काही ऑप्टिकल इल्यूजन घेऊन आलो आहोत, जे पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हीही गोंधळून जाल.
चित्रात तुम्हाला भरपूर काळे ठिपके दिसतील. या ठिपक्यांच्या मधोमध हे चित्र बनविणाऱ्याने हुशारीने इंग्रजीचे तीन शब्द लपवून ठेवले आहेत.
खात्री आहे की हे चित्र पाहून तुम्ही नक्कीच गोंधळले असाल. जर तुम्हाला लपलेले शब्द क्रॅक करता येत नसतील, तर आम्ही तुमचा गोंधळ थोडा कमी करतो.
चित्रात दडलेला शब्द समजून घेण्यासाठी ९० टक्के डोळे बंद करावेत. हे करताच तुम्ही हे चित्र क्रॅक करू शकता. तुम्हाला ते तीन शब्द दिसतील.
शब्द समजून घेण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आपल्या स्क्रीनकडे उजवीकडे-डावीकडे किंवा वर-खाली पाहणे.