Optical Illusion; कोडं! भलेभले लोक ठरू शकतात अपयशी, शोधायचीये मांजर
लक्ष दिलंत तर तुम्हाला ती मांजर नक्कीच दिसेल. आपल्याकडे फक्त तीक्ष्ण नजर असणे आवश्यक आहे.
आजकाल ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. ऑप्टिकल भ्रमाला ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. लोकांना फसवणे हा त्याचा गुणधर्म आहे, हे कोडंच असतं ना! ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या आत काही गोष्टी दडलेल्या असतात, ज्या सहजासहजी दिसत नाहीत. अनेक वेळा लोक त्यांना शोधण्यात आपला खूप वेळ घालवतात पण तरीही त्यांना त्या सापडत नाहीत. या चित्रात दडलेली गोष्ट शोधणे हा काही लहान मुलांचा खेळ नाही, यात भलेभले लोक अपयशी ठरू शकतात.
प्रत्यक्षात या चित्रात एक मांजर दडलेली आहे, जी शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे आणि तेही अवघ्या 7 सेकंदात. तसे पाहिले तर साधारणत: ७ सेकंद फक्त चित्र पाहण्यात आणि समजून घेण्यातच जातात, पण आव्हान हे आहे की तुमचा मेंदू किती वेगाने काम करतो. इतक्या कमी वेळात तुम्ही त्याच्या आत दडलेली मांजर शोधू शकता की नाही.
चित्रात आपण पाहू शकता की, एक जंगल आहे, जिथे मोठे झाड पडलेले आहे. या जंगलात कुठेतरी ती छोटी मांजर लपलेली आहे. हीच मांजर तुम्हाला शोधायचीये.
हिरव्या आणि कोरड्या झाडांमध्ये लपलेली मांजर सापडणं इतकं सोपं नाही, पण लक्ष दिलंत तर तुम्हाला ती मांजर नक्कीच दिसेल. आपल्याकडे फक्त तीक्ष्ण नजर असणे आवश्यक आहे.
तीक्ष्ण नजर असल्याचा दावा अनेक जण करत असले, तरी अशा लोकांचे दावे इथे फेल ठरू शकतात. हा ऑप्टिकल भ्रम आपल्या मेंदूला गोंधळात टाकू शकतो.
जर तुम्ही मांजरीला जंगलात लपलेलं पाहिलं असेल तर ते ठीक आहे आणि जर तुम्हाला ते दिसत नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. मांजर खरंतर पांढऱ्या रंगाची आहे. तरीही तुम्हाला ती मांजर दिसत नसेल तर आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो. पांढरी मांजर त्या सुकलेल्या झाडाच्या अगदी मधोमध आरामात बसलेली असते.
आता आम्हाला खात्री आहे की तुम्ही ती मांजर पाहिली असेल. तरीही दिसत नसेल तर आम्ही ती लाल रंगाच्या गोलात दाखवत आहोत.