झाडी, डोंगर, सूर्य…जिराफ पण लपलाय, दिसतोय?
ऑप्टिकल इल्यूजन थोड्या वेळासाठी लोकांचं लक्ष वेधून घेतात.ऑप्टिकल इल्यूजन थोड्या वेळासाठी लोकांचं लक्ष वेधून घेतात.
असे काही ऑप्टिकल भ्रम आहेत जे समजण्यास बराच वेळ लागतो. यावेळी आपण असाच काहीसा ऑप्टिकल इल्यूजन घेऊन आलो आहोत. ऑप्टिकल भ्रमांचे वैशिष्ट्य ही चित्र आपल्याला फसवण्यासाठी ओळखले जातात. या चित्रात मावळत्या सूर्याचे दृश्य दिसते आणि त्यात जिराफ सुद्धा दडलेला दिसतो. पण हा जिराफ मोजक्याच लोकांना दिसतो.
खरे तर हे चित्र म्हणजे लोकांच्या विचारांना आव्हान देणारे आणि निरीक्षण कौशल्याची परीक्षा घेणारे आहे. ऑप्टिकल इल्यूजन थोड्या वेळासाठी लोकांचं लक्ष वेधून घेतात. या चित्राने मेंदूचा चांगला व्यायाम होतो.
या चित्रात तुम्हाला झाडे दिसतील, ढग दिसतील. तुम्हाला या चित्रात जिराफ शोधायचंय. या चित्राची गंमत म्हणजे हा जिराफ अजिबात दिसत नाही. चित्रात ढग झाडाच्या वर घिरट्या घालत असतात.
सूर्याची लालसरताही दिसत असून सूर्य मावळणार आहे. या सगळ्यामध्ये अचानक तो जिराफ दिसत नाही. या चित्राचे उत्तर केवळ एक टक्काच लोक देऊ शकले आहेत.
खरं तर या चित्रात हा जिराफ एका झाडाजवळ उभा असून फक्त त्याची मान दिसते. नीट निरखून पाहिलं तर मधला वृक्ष आणि सूर्य यांच्यामध्ये दिसणारा आकार म्हणजे जिराफ. काळजीपूर्वक पाहिल्यावर जिराफ कुठे आहे हे कळते.