यात मुलीचा चेहरा लपलाय, दिसतोय?
या कोड्यात तुम्हाला चित्राच्या आतील मुलीचा चेहरा शोधण्याचे आव्हान आहे.
बहुतेक लोक त्यांच्या बुद्ध्यांक पातळीबद्दल जाणून घेण्यासाठी विविध चाचण्या घेण्यास तयार असतात. ऑप्टिकल इल्यूजन हे एक असे साधन आहे ज्याद्वारे आपण आपल्या बुद्धिमत्तेची चाचणी घेऊ शकता. ऑप्टिकल इल्युजन हाही मानसशास्त्र क्षेत्राचाच एक भाग आहे, असे म्हटले जाते. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात जंगलाचं दृश्य दाखवण्यात आलं आहे. हे चित्र मुले आणि प्रौढ दोघांसाठीही आहे. या कोड्यात तुम्हाला चित्राच्या आतील मुलीचा चेहरा शोधण्याचे आव्हान आहे.
हे चित्र एक कुतूहलजनक कोडे आहे जिथे आपल्याला जंगलाच्या स्केचच्या आत मुलीचा चेहरा ओळखावा लागतो जिथे ससे, कासवे, मासे, इत्यादी अनेक प्राणी देखील आहेत.
या ऑप्टिकल भ्रमात एखाद्या मुलीचा चेहरा घनदाट जंगलात कुठेतरी लपलेला असतो. या ऑप्टिकल भ्रमाचा सर्वात कुतूहलजनक भाग म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांनी भरलेल्या जंगलात मुलीचा चेहरा शोधणे.
या ऑप्टिकल भ्रमावर बारकाईने नजर टाका आणि जंगलाच्या आत लपलेल्या मुलीचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मुलीचा लपलेला चेहरा शोधणे खूप कठीण वाटू शकते, परंतु आपण चित्र उलटे फिरवल्यास मदत होऊ शकते.
जंगलातील मुलीचा चेहरा पाहणं तुम्हाला कठीण जात असेल तर आम्ही तुमच्या मदतीला तयार आहोत. चित्राखाली झाडाच्या दोन फांद्यांमध्ये मुलीचा चेहरा लपलेला असतो.
या चित्राबाबत असा दावा करण्यात आला आहे की, जर तुम्ही फक्त 11 सेकंदात जंगलाच्या आत मुलीचा चेहरा पाहू शकलात, तर ते तुमच्या उच्च बुद्ध्यांक पातळीचे लक्षण आहे.
अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर जितका जास्त कराल, तितके तुम्ही हुशार आहात. या चित्राबद्दलही लोकांचं असंच मत आहे.