या चित्रात कोणता गणिताचा अंक आहे? सहज दिसेल, सहज!
हा नंबर तुम्हाला शोधायचा आहे. सोप्पं आहे, जर नीट निरखून पाहिलं तर हा नंबर लगेच दिसू शकतो.
अनेक प्रकारचे मजेशीर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. यातील काही ऑप्टिकल भ्रम आहेत. ऑप्टिकल भ्रमाचा गुण असा आहे की आपण या चित्रांकडे बघताना सहज फसतो. अशा चित्रांमुळे आपण जे पाहतो ते सत्य आहे, असा विश्वास वाटतो, तर तसे मुळीच नसते. असाच एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये एक गणिताचा नंबर दिसतोय.
घरात एखाद्या खोलीची तुटलेली अवस्था आहे, अशी खोली या चित्रात दिसते. इकडून तिकडे सगळं सामान विखुरलेलं आहे. या खोलीत आग लागल्याचं दिसून येतं.
आता या चित्रात एक नंबर लपलेला आहे. हा नंबर तुम्हाला शोधायचा आहे. सोप्पं आहे, जर नीट निरखून पाहिलं तर हा नंबर लगेच दिसू शकतो. ऑप्टिकल भ्रमाचे हे चित्र अवघड आहे.
या चित्राची गंमत म्हणजे हा आकडा अजिबात दिसत नाही. चित्रात खोलीच्या खिडक्या, काचा फुटलेल्या दिसतायत. काचेच्या वस्तू विखुरलेल्या दिसतात.
पण ती संख्या लगेच दिसत नाही. पण हा नंबर सापडला तर तुम्हाला जिनियस म्हटलं जाईल. नसेल सापडला तर आम्ही सांगतो हा लपलेला नंबर नेमका कुठे आहे.
खरं तर या चित्रात दिसणाऱ्या खोलीच्या बाहेरची आणि समोरची खिडकीही फुटलेली आहे. त्याची काचही गायब आहे.
यामध्ये तुमच्या उजव्या हाताच्या वरच्या बाजूने दुसऱ्या क्रमांकाच्या ब्रॅकेटमध्ये गणिताचा चार हा अंक दिसतोय. दिसला? होय. हेच ते उत्तर. या चित्रात “चार” हा अंक लपलाय.