एमए आणि एमटेकची डिग्री… तरीही 5 तरुणींनी घेतला संन्यास, शिवलिंगाला घातली वरमाला

हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील पाच उच्चशिक्षित तरुणींनी ब्रह्मकुमारी संस्थेत सामील होऊन संसाराचा त्याग केला आहे. रुहानी, सुनीता, अंजू, धन वर्षा आणि सिद्धी यांनी राजयोग ध्यानाचा अभ्यास करून ब्रह्मकुमारी म्हणून आपले आयुष्य ईश्वरसेवेसाठी समर्पित केले आहे. या सर्व तरुणींनी उच्च शिक्षण घेतले असून त्यांचा हा निर्णय त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला एक नवे वळण देत आहे. ब्रह्मकुमारी होण्याच्या प्रक्रियेची माहिती आणि त्यांच्या अनुभवांचा उल्लेख या लेखात आहे.

एमए आणि एमटेकची डिग्री... तरीही 5 तरुणींनी घेतला संन्यास, शिवलिंगाला घातली वरमाला
Follow us
| Updated on: Dec 01, 2024 | 3:38 PM

हरियाणाची रुहानी, सुनीता, अंजू, धन वर्षा आणि उत्तर प्रदेशच्या सिद्धीने रविवारी संसाराचा त्याग केला आहे. या पाचही तरुणींनी ब्रह्मकुमारीचा मार्ग स्वीकारला आहे. सिरसा येथील हिसार रोडवरील ब्रह्मकुमारीज आनंद भवनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या तरुणींनी शिवलिंगाला वरमाला घातली आणि आपलं जीवन ईश्वर सेवेसाठी समर्पित केलं. संपूर्ण आयुष्य ईश्वर आणि मानवतेच्या सेवेत घालण्याचा निर्धार या तरुणींनी केला आहे. विशेष म्हणजे या पाचही तरुणी उच्चशिक्षित आहेत.

हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात राहणारी रुहानीने पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं आहे. सुनीता बीकॉम झालेली आहे. तर अंजू 12 वी पास आणि आयटीआयमध्ये डिप्लोमाधारक आहे. सिरसा येथील धनवर्षाने एमटेक केलंय. उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यातील तिलकवा गावातील सिद्धीने एमए केलं आहे. सिद्धी पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील झुनीर येथील ब्रह्मकुमारी आश्रमात कार्यरत आहे.

डोळ्यांची समस्या दूर झाली

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या पाचही तरुणी आता ब्रह्मकुमारीज म्हणून ओळखल्या जातील. रुहानीला सुरुवातीपासूनच अध्यात्माचा ओढा होता. मला अध्यात्माची गोडी होती. त्यामुळे मी शिकत असतानाच ब्रह्मकुमारीज आश्रमात जाऊ लागले. या ठिकाणी आल्यावर माझ्या डोळ्यांची समस्या दूर झाली. मी डोळे बरे व्हावेत म्हणून बरेच उपचार केले. पण त्याचा फायदा झाला नाही. पण केंद्राच्या संपर्कात आले. ध्यान सुरू केलं आणि त्याचा माझ्या डोळ्यांवर अत्यंत चांगला परिणाम झाला. माझी डोळ्यांची समस्या आपोआप दूर झाली, असं रुहानी म्हणते.

हे सुद्धा वाचा

ब्रह्मकुमारी अशा तयार होतात

ब्रह्मकुमारी होण्यासाठी संस्थेची एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया सर्वांना लागू होते. ज्यांना ब्रह्मकुमारीज व्हायचे आहे. त्यांना राजयोग मेडिटेशनचा कोर्स करावा लागतो. त्यानंतर सहा महिने नियमितपणे सत्संग आणि राजयोग ध्यानाचा अभ्यास करावा लागतो. नंतरच प्रभारी दीदीद्वारे सेवा केंद्रात राहण्याची परवानगी दिली जाते, असं संस्थेच्या प्रवक्त्याचं म्हणणं आहे. पाच वर्षापर्यंत सेवा केंद्रात राहिल्यावर संस्थेची गाईडलाईन आणि दिनचर्येचं पालन करायचं असतं. दीदींची वागणूक, स्वभाव, व्यवहार या गोष्टी पाहिल्या जातात. त्यानंतर ट्रायलसाठी मुख्यालय शांतिवनमध्ये माता-पिताच्या परवानगीचं पत्र पाठवलं जातं.

ट्रायल पीरियडच्या दोन वर्षात समर्पण प्रक्रिया पूर्ण केली जाते. समर्पणानंतर दीदी पूर्णपणे सेवा केंद्राच्या माध्यमातून ब्रह्मकुमारीच्या रुपात आपली सेवा देतात. आतापर्यंत जगभरात 50 हजार ब्रह्मकुमारी दिदी ईश्वराच्या सेवेत आहेत.

'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.