Video : भररस्त्यात पोलीस कर्मचाऱ्याचं बासरीवादन, मुंबईमधल्या वडाळ्यातील सुरेल हवालदारची सर्वत्र चर्चा…
वडाळा माटुंगा सायन फोरमने हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. याला त्यांनी तितकंच समर्पक कॅप्शन दिलं आहे. "असं काहीसं सुरेल वडाळा पश्चिममध्ये संडे स्ट्रीटवर पाहायला मिळालं", असं कॅप्शन या व्हीडिओला देण्यात आलं आहे.
मुंबई : सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हीडिओ अनेकाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. त्यातही जर तो एखाद्या पोलीस (police) अधिकाऱ्याचा व्हीडिओ असेल तर तो प्रचंड व्हायरल होतो. आताही असाच एक व्हीडिओ पाहायला मिळतोय. यात एक पोलीस हवालदार बासरी वाजवताना दिसत आहे. मुंबईतीव वडाळा भागातील हा व्हीडिओ आहे. पोलीस हवालदार 1997 साली आलेल्या बॉर्डर चित्रपटातील ‘संदेसे आते है’ हे गाणं वाजवत आहे. हा पोलीस हवालदार रस्त्याच्या मधोमध बसून बासरी वाजवत आहे.या पोलीस हवालदाराची बासरी (Flute playing) इतकी सुरेल आहे की ती अनेकाच्या मनात घर करून गेली आहे. अनेकांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर, व्हॉट्सअॅप स्टेटसवर (viral video) पाहायला मिळत आहे.
वडाळा माटुंगा सायन फोरमने हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. याला त्यांनी तितकंच समर्पक कॅप्शन दिलं आहे. “असं काहीसं सुरेल वडाळा पश्चिममध्ये संडे स्ट्रीटवर पाहायला मिळालं”, असं कॅप्शन या व्हीडिओला देण्यात आलं आहे. मुंबईतील वडाळ्यातल्या रफी अहमद किडवाई मार्गावर हा व्हीडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. हा व्हीडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
Sunday Street at RAK MARG WADALA WEST#sundaystreets #sundaystreetswadala #wadala @sanjayp_1 @mumbaimatterz @MumbaiPolice @cycfiroza pic.twitter.com/iylAP6Ztt7
— Wadala Matunga Sion Forum (@WadalaForum) May 8, 2022
पोलिसांचे विविध व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात काही डान्सचे असतात तर काही गाण्याचे… असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका पोलिसाने केलेला डान्स अनेकांच्या पसंतीला उतरताना दिसतो. सध्या असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक ट्रॅफिक पोलीस भररस्त्यात डान्स करताना पाहायला मिळत आहे. या पोलीसाच्या समोर आणखी एक माणूस नाचताना दिसत आहे. या दोघांचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दोघे मै तेरा तू मेरी, झुमे सारा हिंदुस्तान या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. हा डान्स सध्या अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.