Flying Beast Meme: गौरव तनेजा ट्विटरवर ट्रेंडिंग! अटक झाल्यानंतर फॅन्सने बनवले मिम्स
Flying Beast: नोएडामध्ये कोव्हिडची वाढती प्रकरणे लक्षात घेता तनेजा यांना प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते.
Flying Beast: गौरव तनेजा भारतातला सगळ्यात फेमस असणारा व्लॉगर! सध्या गौरव, फ्लाइंग बीस्ट ट्विटरवर खूप चर्चेत आहे. शनिवारी फ्लाइंग बीस्टला मेट्रो स्टेशनवर गर्दी जमावल्याप्रकरणी अटक करण्यात आली. आपण भेटणार आहोत असं म्हणल्यावर इतकी गर्दी होईल, इतक्या मोठ्या प्रमाणात याचा अंदाज गौरवच्या बायकोला रितू राठीला (Ritu Rathee) आला नव्हता. गौरवची पत्नी रितू राठी, जिचे इन्स्टाग्रामवर 1.6 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत, तिने इन्स्टाग्रामवर सांगितले होते की तिने एक संपूर्ण मेट्रो बुक केली आहे ज्यामध्ये ती तनेजाचा वाढदिवस साजरा करेल आणि केक कापेल. रितू राठीनेच सगळ्या फॅन्सला सेक्टर 51 मेट्रो स्टेशनवर भेटायला बोलावले, हजारोंच्या संख्येत गर्दी झाली आणि पोलिसांनी गौरव तनेजाला (Gaurav Taneja) अटक केली. नोएडामध्ये कोव्हिडची वाढती प्रकरणे लक्षात घेता तनेजा यांना प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर व्लॉगर (Vlogger) गौरव तनेजा ट्विटरवर प्रचंड ट्रेंड झाला. काल, रविवारी गौरव तनेजाला जामीन मिळालाय. त्याच्या फॅन्सने खूप मिम्स बनवले. खरं तर गौरव स्वतः कायद्याचं शिक्षण घेतोय. तो मिम्सला सुद्धा खूप सकारात्मक दृष्टीने घेतो त्याने स्वतः काही मिम्स शेअर केलेत. बघुयात फ्लाइंग बीस्ट गौरव तनेजाच्या फॅन्सने काय धुमाकूळ घातलाय इंटरनेटवर!
1) बापरे! गर्दी बघा…
हे सगळे गौरव तनेजाचे फॅन्स, त्याला भेटायला आले होते. गौरव तनेजा आणि रितू राठीसाठी ही अनपेक्षित गर्दी होती
Being an old subscriber Feeling bad for #gauravtaneja on his birthday he is behind the bar but my simple question is did DMRC dont know who is #flyingbeast & Ritu Rathi ? pic.twitter.com/fYoVzMtzQS
— Aditya Mani Tripathi?? (@mani_tripathii) July 9, 2022
2) गौरव तनेजाला अटक झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये काय झालं असेल?
View this post on Instagram
3) आयडिया रितू राठीची असल्यामुळे लोकांनी तिलाच जबाबदार ठरवलं!
#GauravTaneja celebrating his birthday in noida metro station
His wife be like pic.twitter.com/Vpe4OT2Axs
— Rishabh Jain (@Rishabh24083552) July 10, 2022
4) जेव्हा एक यूट्युबर जेलमध्ये जातो!
#flyingbeast #happybirthdaysir ?????. Memorable bday. Come back soon pic.twitter.com/MZdvQvNJ9f
— ?????? wais ?????????? (@farooqui_shah) July 9, 2022
5) इतकं फेमस व्हायचंच नव्हतं!
“Birthdate ” of #gauravtaneja be like : pic.twitter.com/sK80ukeO7M
— Varsha saandilyae (@saandilyae) July 9, 2022
(ही बातमी केवळ मनोरंजनासाठी आहे. कुणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही.)