‘डिझेल पराठा’चा व्हिडिओ व्हायरल, आता मागावी लागली माफी, असे काय घडले…

food bloggers video viral: हॉटेलच्या मालकाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. आम्ही केवळ खाद्य तेलाचा वापर करतो आणि ग्राहकांना चांगल्या दर्जाचे जेवण देतो, असे हॉटेलचा मालक म्हणताना व्हिडिओ दिसतो. या व्हिडिओनंतर युजर्सकडून अनेक कॉमेंट करण्यात आल्या.

'डिझेल पराठा'चा व्हिडिओ व्हायरल, आता मागावी लागली माफी, असे काय घडले...
डिझेल पराठा
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 12:22 PM

सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी एका फूड ब्लॉगरने ‘डिझेल पराठा’चा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. परंतु त्यानंतर जे घडले त्यामुळे त्या फूड ब्लॉगरला माफी मागावी लागली. हॉटेलच्या मालकास स्पष्टीकरण द्यावे लागले. हा व्हायरल व्हिडिओ चंदीगडमधील एका रस्त्यावरील हॉटेलचा होता.

फूड ब्लॉगरच्या अडचणी सुरु

फूड ब्लॉगर अमनप्रीत सिंग एका दिवशी जेवणासाठी चंदीगडमध्ये पोहचले. त्या ठिकाणी पराठा बनवणाऱ्या व्यक्तीला पाहून ते थांबले आणि त्यांनी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. व्हिडिओ शूट झाला परंतु त्याला सोशल मीडिवर व्हायरल करण्यासाठी ‘डिझेल पराठा’ नाव दिले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर मात्र फूड ब्लॉगरच्या अडचणी सुरु झाल्या.

हे सुद्धा वाचा

काय होते त्या व्हिडिओत

व्हिडिओमध्ये फूड ब्लॉगर अमनप्रीत सिंग यांनी पराठा डिझेलमध्ये भाजला जात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्यासंदर्भात चिंता निर्माण झाली. त्या व्हिडिओत हॉटेल मालक डिझेल पराठा बनवत असल्याचे म्हणताना दिसत होतो. हा व्हिडिओ व्हायरल होताच गदारोळ माजला. सोशल मीडिया युजर्सकडून आरोग्यसंदर्भात चिंता व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया आल्या. डिझेलचे सेवन आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे म्हटले गेले. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी झाली.

व्हिडिओ डिलिट करत मागितली माफी

सोशल मीड‍ियावरील व्हिडिओमुळे कायदेशीर कारवाई होण्याचा धोका फूड ब्लॉगर अमनप्रीत सिंग यांच्यापुढे होतो. त्यामुळे त्यांनी व्हिडिओ डिलिट केला. तसेच दुसरा व्हिडिओ टाकून लोकांची माफी मागितली. हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी टाकला गेला होतो. हॉटेलमध्ये डिझेलचा वापर केला जात नव्हता. हॉटेलच्या मालकाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. आम्ही केवळ खाद्य तेलाचा वापर करतो आणि ग्राहकांना चांगल्या दर्जाचे जेवण देतो, असे हॉटेलचा मालक म्हणताना व्हिडिओ दिसतो. या व्हिडिओनंतर युजर्सकडून अनेक कॉमेंट करण्यात आल्या.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.