परदेशी लोकांना हिंदू संस्कृतीचं आकर्षण, व्हिडीओ बघून अभिमानाने होईल मान उंच!

या सोशल मीडियाच्या जमान्यात परदेशी लोक हिंदू देवतांच्या नावाचा जप करताना आणि भजन गातानाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. मात्र, नुकताच सोशल मीडियावर काही परदेशी नागरिकांचा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये ते हनुमान चालीसा म्हणताना आणि जय श्रीरामच्या घोषणा देताना दिसत आहेत.

परदेशी लोकांना हिंदू संस्कृतीचं आकर्षण, व्हिडीओ बघून अभिमानाने होईल मान उंच!
Foreigners singing hanuman chalisa
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 12:25 PM

मुंबई: हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे. हिंदू धर्माचे सौंदर्य प्राचीन काळापासून परदेशी लोकांचे लक्ष वेधून घेतंय. भारतातील विविध हिंदू पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी परदेशी लोक येतात. हरिद्वार असो, वाराणसी असो, प्रयागराज असो किंवा पुरी, विविध धार्मिक प्रसंगी परदेशी लोक हिंदू देवी-देवतांच्या भक्तीत बुडालेले दिसतात. शिवाय, या सोशल मीडियाच्या जमान्यात परदेशी लोक हिंदू देवतांच्या नावाचा जप करताना आणि भजन गातानाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. मात्र, नुकताच सोशल मीडियावर काही परदेशी नागरिकांचा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये ते हनुमान चालीसा म्हणताना आणि जय श्रीरामच्या घोषणा देताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये एक महिला गिटार हातात घेऊन वाद्य वाजवताना हनुमान चालिसा गाताना दिसत आहे. दरम्यान, व्हिडीओ मध्ये असणारे सगळे लोकं ‘श्रीराम’चा जप करत मस्त वेगवेगळी वाद्ये वाजवताना दिसतायत. आणखी एक वृद्ध व्हायोलिन वाजवताना दिसतो. कॅमेरा पुन्हा दुसऱ्या बाजूला गेला की दुसरा माणूस तबल्यासोबत दिसतो. परदेशी लोकांचा संपूर्ण गट हनुमान चालिसा पठण आणि भगवान रामाच्या नावाचा जप करण्याचा आनंद घेताना दिसत आहे.

music_ki_duniya__1213 ने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक युजर्सनी आपली प्रतिक्रिया दिली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिलं की, “आता जेव्हा इतर देशातील लोक आपली संस्कृती स्वीकारतात तेव्हा मान अभिमानाने उंच होते.”

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.