Video : गावात घुसला बिबट्या, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ काठी वापरत केले जेरबंद, थरारक व्हिडिओ आला समोर
Kashmiri leopard Video: सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी त्यावर कॉमेंट केल्या आहेत. या बिबट्याने अनेकांचे प्राण घेतल्याचे एका युजरने म्हटले आहे. दुसऱ्या ट्रेंकुलाइज गनचा वापर करुन त्याला पकडावे, असे म्हटले होते.
मानवाने जंगलांमध्ये अतिक्रमण केले आहे. यामुळे आता जंगलांमध्ये भक्ष्य राहिले नाहीत. मग भुकेमुळे अनेक प्राणी गावाकडे धाव घेतात. बिबट्यासारखे प्राणी अनेकवेळा गावात घुसल्याची उदाहरणे आहेत. यामुळे गावातील पाळीव प्राणी किंवा मानवावर बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. सोशल मीडियावर वनविभागाचे कर्मचारी आणि बिबट्याच्या लढतीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गावात घुसलेला बिबट्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहेत. केवळ एका कठीच्या मदतीने दोन कर्मचाऱ्यांनी त्या बिबट्याला पकडले. पण काही सेंकदाचा हा थरार अंगावर शहारे आणणार आहे. हा व्हिडिओ काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये
केवळ ५१ सेंकदाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये बिबट्या आणि वन विभागातील कर्मचारी यांच्यात काही पावलाचे अंतर दिसत आहेत. अचानक बिबट्या त्या कर्मचाऱ्यावर हल्ला करतो. मग तो कर्मचारी त्याचे पुढचे दोन पाय पकडून त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी दुसरा कर्मचारी त्याच्या मदतीसाठी धावत येतो. तो काठीने त्या बिबट्यावर हल्ला करतो. मग इतर गावकरी काठ्या घेऊन त्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी येतात. शेवटी त्या बिबट्याच्या मुसक्या आवळल्या जातात. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे सहास या व्हिडिओमधून दिसून येत आहे.
गावकऱ्यांवर केले होते हल्ले
पकडलेल्या बिबट्याने तीन वनकर्मचाऱ्यांसह दोन महिलांवर हल्ले केले होते. त्या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नरभक्षक बनलेल्या या बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून वनविभागाचा प्रयत्न सुरु होता. अखेर दोन कर्मचाऱ्यांनी केलेल्या साहसामुळे त्याला पकडण्यात आले. त्यानंतर त्याला बेशुद्ध करण्यात आले. त्याची तपासणी करुन त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे.
Brave man. Leopard Caught alive at Fetehpora village in Ganderbal District of Central Kashmir. Leopard was roaming in the village and had created panic.#Kashmir #ganderbal#srinagar pic.twitter.com/pUNUozm7UB
— ASIF IQBAL BHAT (@asifiqbalbhat53) April 3, 2024
सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी त्यावर कॉमेंट केल्या आहेत. या बिबट्याने अनेकांचे प्राण घेतल्याचे एका युजरने म्हटले आहे. दुसऱ्या ट्रेंकुलाइज गनचा वापर करुन त्याला पकडावे, असे म्हटले होते.