पोरं असावीत तर अशी, चार भाऊ आपसात भिडले, कोर्टात लढले, कोण म्हणतं आई कुठं काय करते?

आपल्या आईचा सांभाळ करण्यासाठी चार भावांमध्ये चक्क भांडण लागले आहे. विशेष म्हणजे हे भांडण थेट न्यायालयार्यंत गेलं आहे. हा प्रकार मध्यप्रदेशमधील देवास येथील असून आईची काळजी घेण्यासाठी चारही मुलं उत्सुक आहेत. या आईचं नाव सरजूबाई असे आहे.

पोरं असावीत तर अशी, चार भाऊ आपसात भिडले, कोर्टात लढले, कोण म्हणतं आई कुठं काय करते?
COURT STATUE
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 10:07 PM

लखनौ : आई-वडील वृद्ध झाले की त्यांची काळजी तसेच सांभाळ करण्यासाठी पुढे येण्याचं धाडस मोजकीच मुलं करतात. आई-वडिलांचा म्हातारपणी सांभाळ करायचा म्हटलं की खर्च वाढणार, त्यांच्यावर केले जाणारे वैद्यकीय उपचार असा मोठा पसारा असल्यामुळे अनेक मुलं  नाक मुरडतात. सध्या मात्र एक वेगळाच किस्सा समोर आला आहे. आपल्या आईचा सांभाळ करण्यासाठी चार भावांमध्ये चक्क भांडण लागले आहे. विशेष म्हणजे हे भांडण थेट न्यायालयार्यंत गेलं आहे. हा प्रकार मध्यप्रदेशमधील देवास येथील असून आईची काळजी घेण्यासाठी चारही मुलं उत्सुक आहेत. या आईचं नाव सरजूबाई असे आहे.

नेमका प्रकार काय ?

मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशमधील देवास येथे विक्रम सिंह, कंचन सिंह, परमानंद तसेच प्रल्हाद असे चार भाऊ राहतात. यातील प्रल्हाद हा सर्वात छोटा भाऊ असून तो या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सीआयएसएफमधून निवृत्त झाला आहे. निवृत्त झाल्यानंतर तो आपल्या आईला भेटायला गेला. मात्र त्याचा भाऊ परमानंद यांनी त्याला आईला भेटू दिले नाही. त्यानंतर आईला भेटण्याची इच्छा असल्यामुळे प्रल्हाद यांनी 2 सप्टेंबर रोजी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी माझ्या आईला माझ्याकडे राहू दिले जावे अशी विनंती केली.

छोटा मुलगा थेट कोर्टात गेला

प्रल्हाद यांनी तक्रार दिल्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वृद्ध आईचा जबाब नोंबदवण्यासाठी तिला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी जबाबात मला माझ्या छोट्या मुलाकडेच राहायचे आहे, असे आईने सांगितले. आईच्या या जबाबानंतर आई छोटा मुलगा प्रल्हाद याच्याकडेच राहील असा आदेश दंडाधिकाऱ्यांनी दिला. तसेच आपल्या आदेशात आई तिच्या इच्छेनुसार कोणासोबतही राहू शकते, असेही दंडाधिकाऱ्यांनी सांगितले.

कोर्टासमोरच भावांचे भाडण

मात्र, या निर्णयाला आक्षेप घेत माझा धाकटा भाऊ आईची नीट काळजी घेणार नाही म्हणत भावांमध्ये वाद वाढतच गेला. विक्रम, कंचन तसेच परमानंद या तिन्ही भावांनी प्रल्हादसोबत वाद घातला. त्यानंतर पोलिसांचीही मदत घेण्यात आली. हा सर्व वाद थेट कोर्टाबाहेरच झाला. या प्रकरणी विक्रम, कंचन आणि परमानंद या तिन्ही भावांविरोधात प्रल्हाद यांनी पोलिसात पुन्हा तक्रर केली आहे. तक्रारीत मला तसेच माझ्या पत्नीला माझ्या भावांनी मारलं आहे, असं प्रल्हाद यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय, पोलिसांनी या प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल केलाय.

जमिनीच्या मालकीहक्कासाठी आईला सांभळण्यासाठी धडपड 

दरम्यान, या प्रकरणात एक रंजक माहितीदेखील समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरजूबाई यांच्या नावावर काही जामीन आहे. सरजबाईंचा जो सांभाळ करेल त्यालाच ही जमीन मिळणार आहे. याच कारणामुळे जमिनीचा मालकीहक्क मिळावा म्हणून चारही भाऊ त्यांची आई म्हणजेच सरजूबाई यांना सांभाळण्यासाठी भांडत आहेत. सध्या हा किस्सा चर्चेचा विषय ठरला आहे.

इतर बातम्या :

Video: समुद्रकिनारी तडपणाऱ्या डॉल्फीनसाठी देवदूत बनून आला, डॉल्फिनला वाचवणाऱ्यांचं नेटकऱ्यांकडून कौतुक

Video | भरधाव वेगात रेल्वे येताच महिलेने दिला जोराचा धक्का, प्रवाशाचं काय झालं ? अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

Video: लग्नाआधी मिशीला ताव, बायको समोर येताच नवऱ्याचं झालं मांजर, लग्नसोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.