Video | चार मित्रांची बाईकवर सफर, पण मध्येच साप आला अन् भलतंच घडलं, पाहा व्हिडीओ

बाईकवर प्रवास करताना मध्येच साप आल्यामुळे या लोकांची चांगलीच फजिती उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Video | चार मित्रांची बाईकवर सफर, पण मध्येच साप आला अन् भलतंच घडलं, पाहा व्हिडीओ
SNAKE FUNNY VIDEO
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 4:24 PM

मुंबई : सोशल मीडियावर आपण एकापेक्षा एक असे थरारक स्टंट पाहिले असतील. पण सध्या एखाद्या स्टंटचा नव्हे तर दुसराच व्हिडीओ व्हायरल होत आहे. एकाच दुचाकीवर चार मित्र प्रवास करत असताना त्यांच्यासोबत भलतंच घडलं आहे. बाईकवर प्रवास करताना मध्येच साप आल्यामुळे या लोकांची चांगलीच फजिती उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (four people riding bike suddenly snake came in front of the video went viral on social media)

दुचाकी चालवताना मध्येच साप आला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय़ मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एकूण चार लोक एकाच दुकाचीवर बसले आहे. हे चारही लोक दुचाकीवर बसून कुठेतरी जात आहेत. मात्र, यावेळी त्यांच्यासोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. दुचाकीवरुन जात असताना त्यांच्यासमो एक साप आलाय. समोर साप आल्यामुळे दुचाकीवर बसलेले चारही जण चांगलेच गोंधळले आहेत. काय करावं हे त्यांना सूचत नाहीये.

दुचाकीवर बसलेले मित्र खाली पडले

समोर अचानकपणे आलेल्या सापामुळे सगळे गोंधळून गेले आहेत. दुचाकीवर बसलेल्या चारही जणांनी आपले पाय वर हवेत घेतल्याचे दिसत आहे. तसेच पाय वर उचलून ते स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यावेळी त्यांची चांगलीच फजिती झाल्याचं आपल्याला दिसतंय. दुचाकीवर बललेले चारही मित्र थेट खाली पडले आहेत. भर रस्त्यावर पडल्यामुळे सगळे लोक त्यांच्याकडे पाहत आहेत. विशेष म्हणजे रस्त्यावर पडल्यानंतरदेखील सापाने त्यांचा पाठलाग सोडलेला नाही. दुचाकीवर पडल्यानंतरही साप त्यांच्याकडे जात असल्याचे आपल्या दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, खाली पडल्यानंतर मोठ्या मुश्किलीने चारही लोकांनी सापापासून स्वत:ची सुटका करुन घेतली आहे. एका माणसाने तर सापाल पकडण्याचा देखील प्रयत्न केलाय. मात्र यामध्ये तो यशस्वी झाला नाही. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असून आवडीने पाहिले जात आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर enddd_janta या अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय.

इतर बातम्या :

VIDEO: अमृता फडणवीस यांचं नवं गाणं ऐकलंत का?

VIDEO : फॉर्मल्सवर वायूवेगाने दोरीउड्या, फिटनेस फ्रीक गिरीशभाऊ कार्यकर्त्याच्या जीममध्ये

VIDEO: मुलाने समुद्रात सूर मारला अन् तितक्यात बोट आली, पण….

(four people riding bike suddenly snake came in front of the video went viral on social media)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.