Viral : गिफ्ट बॉक्स उघडताच नववधू आधी विचारात पडली अन् मग हसली, काय खास असेल? पाहा Video

लग्न (Wedding) होताच वधू आणि वर आयुष्यातील सर्वात सुंदर बंधनात बांधले जातात. या प्रकारातले व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वरही व्हायरल (Viral) होतात, ज्याचा यूझर्स प्रचंड आनंद घेतात. याच प्रकारामध्ये असा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो पाहून तुम्हाला हसू येईल.

Viral : गिफ्ट बॉक्स उघडताच नववधू आधी विचारात पडली अन् मग हसली, काय खास असेल? पाहा Video
अनोखं गिफ्ट पाहताना नववधू
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 4:15 PM

Marriage Funny Video : असं म्हणतात, की लग्न (Wedding) होताच वधू आणि वर आयुष्यातील सर्वात सुंदर बंधनात बांधले जातात. लग्न आटोपल्यानंतर नातेवाईक स्टेजवर दोघांना आशीर्वाद देण्यासाठी येतात. त्याचवेळी मित्र मैत्रिणी मजामस्तीत अशी भेटवस्तू देतात, जे पाहून हसायलाही येतं आणि आश्चर्यही वाटते. असे व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वरही व्हायरल (Viral) होतात, ज्याचा यूझर्स प्रचंड आनंद घेतात. याच प्रकारामध्ये असा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो पाहून तुम्हाला हसू येईल. बहुतेक लग्नांमध्ये वराचे मित्र मस्ती करताना दिसतात. कधी-कधी ते अशा पद्धतीनं थट्टा करतात, की लग्नाचं सगळं वातावरणच गंमतीशीर होऊन जातं. आता हा व्हिडिओ पाहा फक्त लग्नात वधूला तिच्या मैत्रिणींकडून एवढी असामान्य भेट दिली जाते, ते पाहून तुम्हीही तेच म्हणाल, ‘हे मित्र-मैत्रिणी कधीच सुधरणार नाहीत.

असामान्य भेट

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की लग्नानंतर वधू आणि वर स्टेजवर बसले आहेत. त्यांच्या आजूबाजूला लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंचा ढीग असतो. मग वधू एक एक करून सर्व भेटवस्तू उघडते. या दरम्यान, वधू त्यांच्याकडून भेटवस्तू घेते, परंतु जेव्हा ती उघडते तेव्हा ती खूप अस्वस्थ होते. कारण गिफ्ट बॉक्सचं पॅकिंगच इतकं मजबूत असतं. शेवटी वधूनं भेटवस्तू उघडल्यावर तिचे भावच बदलले आणि ती विचारात पडली. त्या पॅकेटमध्ये एक सर्जिकल मास्क होता, जो पाहून वधू आधी विचारात पडली आणि मग हसली.

इन्स्टाग्रामवर शेअर

सोशल मीडियावर हा व्हिडिओ जो कोणी पाहिल तो हसतच राहील. यामुळेच यूझर्स यावर मजेशीर कमेंट करत आहेत. एका यूझरनं लिहिलं, ‘क्लिप खरोखरच मजेदार होती, पण कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत.’ दुसऱ्या यूझरनं कमेंट करताना लिहिलं, ‘तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी हे मित्र सुधरणार नाहीत.’ दुसऱ्या यूझरनं लिहिलं, ‘वराच्या मित्राला असा विनोद शोभत नाही’. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ghantaa नावाच्या यूझरनं शेअर केला आहे, ज्यावर आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लाइक आहेत.

Viral : मैत्रिणींना नवरीला उचलून टाकायचं असतं स्विमिंग पूलमध्ये, पण घडलं भलतंच; ‘हा’ Video तुमचं मनोरंजन करेल!

Nagin Dance Viral Video : भौतिकशास्त्राचे सर्व नियम मोडणारा ‘असा’ नागीण डान्स पाहिला नसेल, हसून हसून लोटपोट व्हाल!

Funny Dance : याला आवरा, नाहीतर तुम्हालाही चावल्याशिवाय राहणार नाही..! नागीण डान्सचा ‘हा’ Viral Video पाहताना हसून हसून पोट दुखेल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.