Viral On Instagram: त्यादिवशी बेडकाने ठरवलं, बॉडी बनवायची आणि तिला दाखवून द्यायचं!

जणू काही या बेडकाचं प्रपोजल (Proposal) कुणीतरी तरी नाकारलंय आणि मग बेडूक रागात येऊन व्यायाम करतोय. जणू काही या बेडकाला दाखवून द्यायचंय की, "मला नाकारल्यावर, इतक्या चांगल्या बेडकाला नाकारल्यावर काय होतं".

Viral On Instagram: त्यादिवशी बेडकाने ठरवलं, बॉडी बनवायची आणि तिला दाखवून द्यायचं!
ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 5:13 PM

प्राण्यांचे व्हिडीओ हा सगळ्यांचा आवडीचा भाग आहे. प्राणी डान्स करतात, उड्या मारतात, प्राणी काय नाही करत? प्राण्यांचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. नादच नाय! कधी कधी तर माणसांपेक्षा प्राण्यांचेच व्हिडीओ जास्त वायरल होतात. का नाही होणार? आता हा तर व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय. माणसाला सुद्धा हे जमणार नाहीये असं लोकं म्हणतायत. सोशल मीडियावरील (Social Media) अनेक व्हिडिओ वायरल (Viral Video) होत असतात. इतके वायरल होतात की काही आपल्याला हसायलाही भाग पाडतात. सध्या एका बेडकाचा व्हिडीओ प्रचंड वायरल होतोय. एक बेडूक वेट लिफ्टिंग करताना दिसला तर तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक बेडूक जिममध्ये असल्याप्रमाणे वेट लिफ्टिंग करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी”. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसलाय. जणू काही या बेडकाचं प्रपोजल (Proposal) कुणीतरी तरी नाकारलंय आणि मग बेडूक रागात येऊन व्यायाम करतोय. जणू काही या बेडकाला दाखवून द्यायचंय की, “मला नाकारल्यावर, इतक्या चांगल्या बेडकाला नाकारल्यावर काय होतं”.

“ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by funny video (@comedy_videos7952)

लोकांच्या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया

काही युजर्सनी (सोशल मीडिया युजर्स) या व्हिडीओमध्ये बेडकाशी असं वागणं लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. काहीजण म्हणाले की, तुम्ही सगळे हसताय पण या बेडकाचे हात घट्ट दोरीने कसे बांधलेले आहेत ते बारकाईने बघा. बेडकाचा त्रास कोणालाच दिसत नाही. निष्पाप प्राण्यांना त्रास देण्याची लाज वाटली पाहिजे, असे एका युजरने म्हटले आहे.

व्हिडिओ झाला व्हायरल

काहींना हा व्हिडिओ आवडला तर काहींनी त्याला ट्रोल केलं. पण इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ आगीसारखा पसरत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 12 हजारहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. 150हून अधिक लोकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.