Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॉपचं Engineering College, होस्टेलच्या जेवणात आढळला बेडूक!

हा धक्कादायक प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा विद्यार्थ्यांनी याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. हे फोटो प्रचंड व्हायरल झालेत. समजा त्या मुलाला बेडूक दिसलाच नसता तर? बापरे! विचार सुद्धा करवत नाही. या फोटोवर अनेकांनी गंभीर प्रतिक्रिया दिलीये. विशेष म्हणजे हे इंजिनिअरिंग कॉलेज देशातील 42 नंबरचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे.

टॉपचं Engineering College, होस्टेलच्या जेवणात आढळला बेडूक!
frog found in hostel messImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 4:11 PM

भुवनेश्वर: मेस मधील जेवण कुणाकुणाला आवडतं? असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्ही काय सांगाल? याचं उत्तर खूप सोपं आणि सगळ्यांकडून सारखंच येणारे. नाही! मेसचं जेवण कुणालाही आवडत नाही. तुमच्यापैकी अनेक लोकांना ही कल्पना असेल की घरचं जेवण नसेल तर काय होतं. सोशल मीडियावर सुद्धा अनेक लोक मेसच्या म्हणजेच खानावळीच्या जेवणाला नावं ठेवतात. यावर खूप मिम्स असतात. सिनेमामध्ये सुद्धा मेसच्या जेवणाची जाम खिल्ली उडवली जाते. हॉस्टेल, कॉलेज आणि मेस हे एक अनोखं नातं असतं नाही का? पण खरंच मेसचं जेवण असंच असतं का? त्याला खरंच काही चव नसते का?

फोटो खूप व्हायरल झालाय

सोशल मीडियावर खानावळीच्या जेवणाला खूप नावं ठेवली जातात. कधी कधी बातम्या सुद्धा असतात की अमुक-तमुक ठिकाणी जेवणात हे-ते आढळलं. हा फोटो बघा. हा फोटो इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेसचा आहे. हा फोटो खूप व्हायरल झालाय. इंजिअरिंगमध्ये जिथे पालक खूप पैसे भरून आपल्या पाल्याला शिकवतात, जिथे लाखो रुपये खर्च केले जातात तिथल्या मेसची ही अशी अवस्था आहे. काय वाटतं कसला फोटो असेल? अहो इथे चक्क जेवणात बेडूक आढळलाय.

हे कॉलेज देशातील 42 नंबरचं इंजिनिअरिंग कॉलेज

भुवनेश्वर मधल्या एका प्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेजमधला हा फोटो आहे. इथल्या हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या मुलाच्या जेवणात बेडूक आढळलाय. हा धक्कादायक प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा विद्यार्थ्यांनी याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. हे फोटो प्रचंड व्हायरल झालेत. समजा त्या मुलाला बेडूक दिसलाच नसता तर? बापरे! विचार सुद्धा करवत नाही. या फोटोवर अनेकांनी गंभीर प्रतिक्रिया दिलीये. विशेष म्हणजे हे इंजिनिअरिंग कॉलेज देशातील 42 नंबरचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.