लेह ते मनाली, 55 तास सायकल चालवणारी पहिली महिला! पुण्याची सायकलपटू प्रीती मस्के गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

मनाली येथे काल दुपारी 1.13 वाजता बीआरओचे कमांडर कर्नल शबरीश वाचली यांच्या उपस्थितीत तिने प्रवास पूर्ण केला.

लेह ते मनाली, 55 तास सायकल चालवणारी पहिली महिला! पुण्याची सायकलपटू प्रीती मस्के गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
पुण्याची सायकलपटू प्रीती मस्के गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 1:25 PM

मनाली: दोन मुलांची आई असलेल्या पुण्याची सायकलपटू प्रीती मस्के (45)  (Preeti Maske, Pune) हिने शुक्रवारी 55 तास 13 मिनिटांत लेह ते मनाली अशी सायकल चालवणारी पहिली महिला बनून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record)तयार केला. तज्ञांनी सांगितले की, 430 कि.मी. चा मार्ग आणि त्याला 8,000 मीटर उंची असा हा टास्क खूपच कठीण होता. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने तिला 60 तासांची विंडो दिली होती. प्रीतीच्या या प्रवासाला लेह येथून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (BRO) 22 जून रोजी सकाळी 6 वाजता लेह येथील मुख्य अभियंता ब्रिगेडिअर गौरव कार्की यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला. मनाली येथे काल दुपारी 1.13 वाजता बीआरओचे कमांडर कर्नल शबरीश वाचली यांच्या उपस्थितीत तिने प्रवास पूर्ण केला.

झोपेचे व्यवस्थापन हे एक मोठे आव्हान

प्रीतीचे क्रू मेंबर आनंद कंसल म्हणाले, “या अतिउंचीवरील सायकलिंग मोहिमेत प्रीतीला न झोपता प्रवास करायचा होता त्यामुळे झोपेचे व्यवस्थापन हे एक मोठे आव्हान होते. हाय पासवर श्वास कोंडल्यामुळे तिने या मार्गावर दोनदा ऑक्सिजन घेतला.” ते म्हणाले, “प्रीतीसाठी ही एक आव्हानात्मक मोहीम होती, जी बीआरओच्या पाठिंब्याशिवाय शक्यच नव्हती. बीआरओने दोन वाहनांसह सॅटेलाइट फोन, वैद्यकीय सहाय्यक तैनात केली होती.

प्रवासाच्या 10 दिवस आधी लेहला भेट दिली

प्रीती मस्केने तिच्या प्रवासाच्या सुमारे 10 दिवस आधी लेहला भेट दिली होती. ही भेट देण्याचे कारण म्हणजे तिला या हवामानाची सवय आहे याची खात्री करणे. जेव्हा लोकांना तिच्या वयाबद्दल कळतं तेव्हा ती बर् याचदा आश्चर्यचकित करते. “मी 40 वर्षांची झाल्यावर सुरुवात केली. माझा विश्वास आहे की वय ही फक्त एक संख्या आहे. आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे आणि मग काहीही आपल्याला थांबवू शकत नाही. मी 2018 मध्ये सुरुवात केली होती आणि तेव्हापासून शेकडो महिलांनी मला फोन करून टिप्स मागितल्या आहेत. माझा विश्वास आहे की मी काहींना प्रेरणा दिली आहे,” ती सांगते.

हे सुद्धा वाचा
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.