Video: एअरपोर्टवर बुके घेऊन आईला घ्यायला गेला, आईने चपलेखाली चांगलाच चोपला, पाहा आई-मुलाच्या अनोख्या नात्याचा व्हिडीओ

व्हिडिओमध्ये मुलगा त्याच्या आईचे विमानतळावर स्वागत करताना दिसत आहे. मुलाच्या हातात सुंदर फुलांचा गुच्छही आहे. त्याच मुलाने दुसऱ्या हातात एक बोर्ड घेतला आहे, ज्यावर लिहिले आहे की, मला तुझी खूप आठवण आली.

Video: एअरपोर्टवर बुके घेऊन आईला घ्यायला गेला, आईने चपलेखाली चांगलाच चोपला, पाहा आई-मुलाच्या अनोख्या नात्याचा व्हिडीओ
विमानतळावर आईला घ्यायला गेला, आईने चपलेने चांगलाच चोपला
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 9:30 AM

आई-मुलाचे नातं खूप सुंदर आणि प्रेमळ असतं. आपल्या मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आई कोणत्याही थराला जाऊ शकते. आई आणि मुलाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. ते व्हिडीओ जितके गोंडस आहेत तितकेच ते इंटरनेटवर व्हायरल होतात. आई आपल्या मुलांवर जितके प्रेम करते, तितके तिने जगात क्वचितच कोणावर प्रेम केले असेल. म्हणूनच असं म्हणतात की, आईचं प्रेम शब्दात व्यक्त करता येत नाही. सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्यातही असंच काहीसं घडताना दिसत आहे.

सोशल मीडियावर जो व्हिडिओ दिसत आहे, तो विमानतळाचा असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये मुलगा त्याच्या आईचे विमानतळावर स्वागत करताना दिसत आहे. मुलाच्या हातात सुंदर फुलांचा गुच्छही आहे. त्याच मुलाने दुसऱ्या हातात एक बोर्ड घेतला आहे, ज्यावर लिहिले आहे की, मला तुझी खूप आठवण आली. व्हिडिओमध्ये जेव्हा आई तिच्या मुलापर्यंत पोहोचते तेव्हा एक मजेदार घटना घडते. हा व्हिडीओ सर्वांनाच आकर्षित करणारा आहे.

तुम्हीच पाहा काय घडलं व्हिडीओत:

View this post on Instagram

A post shared by Anwar Jibawi (@anwar)

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, आई जेव्हा मुलापर्यंत पोहोचते. तेव्हा ती त्याच्यावर चप्पलांचा वर्षाव करू लागते. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अन्वर जिबावीच्या पेजवर पाहू शकता. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – माझी आई परत आली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, त्यासोबतच हजारो कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर अनेकजण या व्हिडिओला मजेदार म्हणत आहेत.

अनेक सोशल मीडिया युजर्सने आईच्या या प्रेमाचे वर्णन केले आहे. हा व्हिडिओ काही काळापूर्वी इंटरनेटवर अपलोड करण्यात आला होता आणि आता तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका यूजरने कमेंट करत लिहिले – आई-मुलाचे नाते खूप सुंदर आणि अतूट आहे. आणखी एका युजरने लिहिले – आई आणि मुलाचे असे प्रेम अनेकदा तुम्ही सर्वांनी पाहिले असेल. दुसर्‍याने लिहिले – हा व्हिडिओ खूप मजेदार आणि प्रेमाने भरलेला आहे.

हेही पाहा:

Video: या व्हिडीओने तुमच्या डोळ्यात पाणी नाही आणलं तर समजा, तुमचं काळीज दगडाचं होत चाललंय!

मालकीणीचा पाय फ्रॅक्चर, कुत्र्याने रात्र मालकीणीच्या पायाजवळ काढली, निष्ठावान कशाला म्हणतात पाहा Video

 

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.