‘हे’ तर रिअल लाइफमधले tom & jerry! मांजरीला पाहून उंदीर काठीच्या टोकावर..! Funny video viral

Animals funny videos : प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ सर्वांचे मनोरंजन करत असतात. सध्या मांजर (Cat) आणि उंदराचा (Rat) एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. ज्यामध्ये उंदीर काठीवर बसलेला दिसत आहे आणि मांजर त्याच्याकडे नजर रोखून उभी आहे.

'हे' तर रिअल लाइफमधले tom & jerry! मांजरीला पाहून उंदीर काठीच्या टोकावर..! Funny video viral
उंदराच्या भीतीने काठीच्या टोकावर बसलेला उंदीरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 1:07 PM

Animals funny videos : प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ सर्वांचे मनोरंजन करत असतात. त्यात कुत्रा आणि मांजर तर सर्वात पुढे आहेत. तर मांजर आणि उंदीर ही जोडीही चांगलेच मनोरंजन करते. सध्या मांजर (Cat) आणि उंदराचा (Rat) एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. ज्यामध्ये उंदीर काठीवर बसलेला दिसत आहे आणि मांजर त्याच्याकडे नजर रोखून उभी आहे. व्हिडिओ पाहून असे दिसते, की मांजरीला उंदराची शिकार बनवायची आहे. पण उंदीर खाली यायला काही अजिबात तयार नाही. उंदराकडे पाहून असे दिसते, की मांजर पाहिल्यानंतर तो घाबरला आहे. मांजर त्याच्याकडे सतत पाहत असते. जेणेकरून उंदीर खाली येईल आणि मग आपण त्याचा फडशा पाडू. मात्र, पुढे काय झाले ते व्हिडिओमध्ये दाखवलेले नाही. पण हा एक अतिशय मजेदार व्हिडिओ आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 0zr__t नावाने शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत 8 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले तर 1 लाख 16 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रियल लाइफमधले टॉम अँड जेरी

व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देताना एका यूझरने लिहिले, की हे खऱ्या आयुष्यातील टॉम अँड जेरी आहे. त्याचवेळी आणखी एका यूझरने लिहिले, “जर तू खाली उतरला नाहीस तर मी तुला खूप मारीन.” तिसर्‍या यूझरने लिहिले, “कधीही हार मानू नकोस.” चौथ्या यूझरने लिहिले, “आम्हाला याचा दुसरा भागही पाहावा लागेल.”

आणखी वाचा :

Viral : भल्यामोठ्या अजगराच्या अंगावर बसून खेळतोय चिमुकला, Video काढणाऱ्यावर संतापले लोक

शंकरपाळ्या आणि कारल्यानंतर आता राज्यभर गाजतंय ‘या’ दोघांचं भांडण, Beedमधला Video viral

Booked a Whole Train : अख्खी ट्रेन बुक करून तरुणांनी केली धम्माल, जयपूरमधला ‘हा’ Viral video पाहाच

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.